ज्ञानेश्वरी

    03-Nov-2026
Total Views |

Dyaneshwar 
वत्स घालयाही वरीŸ। धेनु न वचावी दुरीŸ।
अनन्य प्रीतीची परीŸ। ऐसी आहेŸ।। (18.78)
 
देव व भक्त, गुरू व शिष्य यांच्यांतील प्रेम कसे असावे ? याचा निर्देश या ओवीत केला आहे. अठराव्या अध्यायात अर्जुनाने कर्मयाेग व ज्ञानयाेग यांतील फरक विचारला आहे. कर्मठ मनुष्य माेक्षाकडे कसा जाणार? सकाम कर्म आणि कर्माचा त्याग म्हणजे संन्यास यांतील काेणाचा अंगीकार करावा? ज्ञानाला बाेलवणारे जे मंत्र आहेत ते ज्ञानाचे पीक चांगले पिकवितात. त्याग व संन्यास या दाेहाेंचे आचरण करून कर्मबंधनातून सुटावे म्हणजे त्याग व संन्यास यांचे रूप स्पष्ट हाेईल. या भूमिकेवर त्याग व संन्यास यांतील फरक स्पष्ट करण्यासाठी अर्जुनाने देवांना विचारले.
 
या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी अठरावा अध्याय सुरू झाला. या प्रश्नावर देव स्तब्ध राहिले. हे पाहून अर्जुन मनातून खिन्न झाला. खरे पाहता अर्जुनाला सर्व समजले हाेते. तरी देव स्वस्थ राहिले हे त्याला सहन हाेईना. या प्रसंगी ज्ञानेश्वर एक समर्पक दृष्टांत देत आहेत. वासरू तृप्त झाल्यावरदेखील गाय आपणांपासून दूर जाऊ नये असे त्या वासरास वाटते.
 
एकनिष्ठ प्रीतीची रीतच अशी आहे. या प्रीतीमुळे आपल्या आवडत्या माणसाशी कारण नसताना बाेलावे, एकदा पाहिले तरी पुन्हा डाेळे भरून पहावे, आवडता विषय पुन्हा पुन्हा भाेगावा. यामुळे प्रेम दुप्पट वाढत जाते. प्रेमाचे हे रूप ज्ञानेश्वरांनी पुन्हा स्पष्ट केले. अर्जुन तर प्रेमाचीच मूर्ती हाेता. म्हणून देवाचे स्पष्ट व स्तब्ध राहणे हे अर्जुनास पसंत पडले नाही. त्याच्या मनास बरे वाटेना. एरवी न दिसणारे रूप आरशामध्ये दिसते.
 
त्याप्रमाणे प्रेमस्वरूप ब्रह्मवस्तू प्रश्नाेत्तराच्या निमित्ताने आकारास येते. आणि येथे तर संवादाच बंद पडलेला असताना प्रेमाचा अनुभव कसा येईल? आत्मसुखाच्या भाेगाला अर्जुन उत्सुक असल्याकारणाने त्याने देवाला गीतारूपी वस्त्र उलगडावयास लावून त्याग व संन्यास यांच्या संबंधाने विचारले.