नाशिक, 1 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
गाेदावरीचा पावन तीर वैदिक मंत्रांचा मंगलघाेष शंखनादाने दुमदुमलेला आसमंत भगव्या धर्मध्वजेच्या स्वागतासाठी एकवटलेला संतसमुदाय अन् श्रद्धेच्या अपार भावनेने भारावलेले वातावरण! जणू हजाराे वर्षांच्या भारतीय आध्यात्मिक परंपरेने येथील रामतीर्थावर पुन्हा एकदा सजीव रूप धारण केले.
गाेदामाईच्या साक्षीने राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्या हस्ते भगवी धर्मध्वजा आकाशात फडकली आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या मंगलमय प्रारंभाचा ऐतिहासिक शंखनाद झाला. या अलाैकिक क्षणाने अवघी नाशिकनगरी भ्नितरसात न्हाऊन निघाली. त्र्यंबकनगरीत कुशावर्तावरही राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वज फडकावण्यात आला.
रामतीर्थावर उपस्थित प्रत्येकाच्या अंतःकरणात सिंहस्थाच्या स्वागताची अनामिक ओढ दाटून आली हाेती. राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजा आकाशात डाैलाने फडकताच शंखनादाचा निनाद दशदिशांत घुमला. अमाप उत्साहात महाकुंभाच्या पावन पर्वांची नांदी त्यातून झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मंत्री, नेते, विविध आखाड्यांचे महंत, धर्माचार्य आणि साधूसंत व मान्यवर उपस्थित हाेते. या साेहळ्यातील प्रत्येक विधी श्रद्धाभावाने पार पडला. राष्ट्रपतींनी प्रथम यज्ञकुंडात आहुती अर्पण केली. यज्ञकुंडातील पवित्र अग्निज्वाला आणि वैदिक मंत्राेच्चारांनी वातावरणात मंगलमय चेतना निर्माण झाली.
त्यानंतर राष्ट्रपतींनी जीवनदायिनी गाेदावरीचे विधिवत पूजन करून धर्मध्वजेला वंदन केले. पुराेहितांच्या मंत्रघाेषात त्यांच्या हस्ते धर्मध्वजाराेहणाचा परममंगल क्षण साकारला. धर्मध्वजा आकाशात फडकताच शंखनादाने रामतीर्थाचा आसमंत दुमदुमन गेला. मंगलवाद्यांच्या निनादात मंत्रपुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थावर राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजपूजन साेहळा झाला. राष्ट्रपतींच्या हस्ते गाैतमी गंगा गाेदावरी पूजन, सिंहस्थ ध्वजपूजन, विशेष अर्घ्य अर्पण तसेच गाेदावरी आरती करण्यात आली. पुराेहित संघाच्या वतीने राष्ट्रपतींना सन्मानपूर्वक ताम्रपट प्रदान करण्यात आला.