सामाजिक समरसता हाच सिंहस्थाचा विचार : राष्ट्रपती मुर्मू

साडेसहा हजार जनजाती बांधवांच्या हस्ते गोदाआरतीचा विक्रम

    02-Nov-2026
Total Views |

KumbhmelaNashik 
नाशिक, 1 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
पवित्र नाशिक नगरीस माझा नमस्कार...! या शब्दांत आपल्या विचार मांडणीची सुरुवात करत राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी नाशिककरांची मने जिंकली.
 
भारतीय जनमानसात दडलेली आस्था आणि सामाजिक समरसता याचाच विचार प्राचीन काळापासून सिंहस्थ कुंभमेळ्यात करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा भारतीय मूल्यपरंपरेस एका सूत्रात गुंफताे, असे गाैरवाेद्गार राष्ट्रपतींनी काढले.
साडेसहा हजार जनजाती बांधवांच्या सहभागाने पार पडलेल्या विश्वविक्रमी गाेदावरी महाआरती ाेहळ्यात त्या बाेलत हाेत्या.
नाशिक जिल्ह्यातील 650 दुर्गम जनजाती गावांमधून 6500 जनजाती बांधवांनी या गाेदावरी महाआरती साेहळ्यात भाग घेतला.
दुष्काळाच्या सावटात राज्य व केंद्र शासन नागरिकांची काळजी वाहण्याचा कसाेशीने प्रयत्न करेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्य्नत केला.
 
यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मंत्री, नेते, कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकारी, महापालिका कर्मचारी, नाशिक- त्र्यंबकेश्वर येथील सर्व आखाड्यांचे साधू- महंत, महापाैर हिमगाैरी आडके-आहेर आदी उपस्थित हाेते. हा कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी गाेदावरीच्या स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याबराेबरच सामाजिक संस्थांनीही सक्रिय सहभाग नाेंदवावा, असे आवाहन राज्यपालांनी केले. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या कुंभगीत व संकेतस्थळाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले; तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ व त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष टपाल तिकिटांचे अनावरणही राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. हे विशेष टपाल तिकीट रामचंद्र जायभावे यांनी राष्ट्रपतींना सुपूर्द केले.