नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती, तद्वतच अनेक संतलक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे. पृथ्वी ही क्षमा-शांतिरूप आहे. त्याप्रमाणेच संत असतात. शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंत:स्थिती हीच कारण आहे. जिथे स्वार्थ तिथे अशांती. भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत भावना, तिथे खरी शांती नाही.
अनन्यतेने शांती प्राप्त हाेते, आणि तीच परामार्थाचा पाया आहे. पैसा आणि लाैकिक ही अशाश्वत आहेत. त्यांच्यात चित्त ठेवल्याने अशांतीच येणार. शांती बिघडायला दाेन कारणे आहेत : एक गत गाेष्टींचा शाेक, आणि दुसरे पुढची चिंता. आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दाेन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही.
आणखी महत्त्वाची गाेष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही; पश्चात्ताप करण्याची पाळी येईल. म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे. भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले तर हातून दुष्कर्म हाेणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले. ताे तिथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे. तिथे लाेक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लाेकांची ये-जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला, म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले. साधूची शांती पूर्वीच्या स्थळी हाेती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम हाेती.
शेतमालकाला आश्यर्च वाटले. ज्याचे मन शांत आणि चिंतारहित असते त्याला कुठेही ठेवा, ताे शांतच राहणार. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे.
त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. कर्तेपण आपल्याकडे घेऊ नये. अकर्तृत्वभाव ठेवावा. अशाने शांती येईल. जगच्चालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल. एकनाथांची शांती अगाध हाेती. नाथांसारखी शांती यायला परम्भाग्य पाहिजे. राजेरजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले, कारण ते शांतीची मूर्ती हाेते. ही शांती काय केले असताना मिळेल? भगवत्स्मरणावाचून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडते ते ते भगवदिच्छेने घडते ही दृढ भावना असणे हेच शांतीचे लक्षण आहे. कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येताे. विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती, याने शांती