आराेग्याबद्दल जागरूकता वाढत असताना रात्री फळे खाऊ नका हा सल्ला अनेकदा ऐकायला मिळताे. काही जण म्हणतात की रात्री फळे खाल्ल्याने सर्दी हाेते, वजन वाढते, पचन बिघडते किंवा साखर वाढते.पण हा सल्ला सर्वांसाठी खरा आहे का? की हा अर्धवट माहितीवर आधारित गैरसमज आहे?
फळे निसर्गाची पाैष्टिक देणगी फळे ही जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि नैसर्गिक साखरेचा उत्तम स्राेत आहेत.
राेजच्या आहारात फळांचा समावेश केल्याने अनेक फायदे हाेतात. जसे की, राेगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचा आणि केस निराेगी राहतात,पचन सुधारते,बद्धकाेष्ठता कमी हाेते,हृदयविकाराचा धाेका कमी हाेताे,शरीराला झटपट ऊर्जा मिळते.म्हणूनच फळे कधी खावी हा प्रश्न महत्त्वाचा असला, तरी फळे खाणेच टाळणे याेग्य नाही. रात्री फळे खाऊ नका हा सल्ला का दिला जाताे? यामागे काही कारणे सांगितली जातात:
1. पचन मंदावते : रात्री झाेपेच्या वेळी शरीराची पचनक्रिया तुलनेने मंदावते. काही लाेकांचे पचन कमकुवत असल्यास रात्री जड किंवा जास्त प्रमाणात फळे खाल्ल्याने गॅस, फुगणे किंवा अस्वस्थता हाेऊ शकते.
2. नैसर्गिक साखर : फळांत फ्रक्टाेज ही नैसर्गिक साखर असते. रात्री कमी हालचाल हाेत असल्याने काहींना वाटते की ही साखर चरबीमध्ये बदलते. प्रत्यक्षात प्रमाण महत्त्वाचे असते.
3. थंड प्रकृतीची फळे : कलिंगड, खरबूज, संत्री यांसारखी काही फळे रात्री खाल्ल्यास सर्दी किंवा घशात त्रास हाेताे असा समज आहे. वैज्ञानिक पुरावे मात्र मर्यादित आहेत. फळे रात्री खाणे पूर्णपणे चुकीचे नाही.
अनेक लाेक रात्री हलका स्नॅक म्हणून फळे खातात आणि त्यांना काेणताही त्रास हाेत नाही. मात्र, व्यक्तीची प्रकृती, आजार, प्रमाण आणि काेणते फळ खाल्ले जाते यावर परिणाम अवलंबून असताे. एक लक्षात घेतलं पाहिजे की, फळे असाे वा अन्य काही आहारात वेळेपेक्षा एकूण संतुलन, प्रमाण आणि नियमितता महत्त्वाची असते.
फळे आराेग्यदायी आहेत, पण ती याेग्य प्रमाणात आणि आपल्या प्रकृतीनुसार खाल्ली पाहिजेत. रात्री फळे खाऊ नका हा नियम सर्वांसाठी लागू नाही. काहींना त्रास हाेऊ शकताे, काहींना नाही. त्यामुळे अंधानुकरण न करता आपल्या शरीराचे संकेत ओळखा.
याेग्य फळ, याेग्य प्रमाण आणि याेग्य वेळ निवडल्यास फळे रात्रीही आराेग्यदायी ठरू शकतात.