ज्ञानेश्वरी

    02-Nov-2026
Total Views |

Dyaneshwar 
कां गंगायमुनाउदकŸ। बाेधबगें वेगळीकŸ।
दावी हाेऊनि एकŸ। पाणीपणें Ÿ।। (18.51) 17
 
व्या अध्यायानंतर अठरावा अध्याय कसा सुरू झाला याचे स्पष्टीकरण ज्ञानेश्वर या ओवीत सांगत आहेत. शरीराचे एकत्व न बिघडविता स्त्री आणि पुरुष असे दाेन आकार अर्धनारीनटेश्वरात दिसतात.
 
किंवा गंगा व यमुना यांच्या ओघांकडे पाहिले असता ते दाेन वेगळे दिसत असले तरी दाेन्ही नद्यांचे पाणी पाणी या दृष्टीने एकच असते.
प्रत्येक दिवसाला चंद्राला वेगवेगळ्या कला प्राप्त झाल्या तरी पाैर्णिमेच्या दिवशी चंद्रबिंबाच्या ठिकाणी त्या कला वेगळ्या दिसत नाहीत. गीतेचेही असेच आहे. चरण वेगळे केले तरी श्लाेक लक्षात येताे.
 
एक अध्याय संपवून दुसरा अध्याय प्रारंभ झाला की, अध्याय निराळा असे वाटते, परंतु ग्रंथप्रतिपादनात सिद्धांताच्या दृष्टीने अनेकत्व येत नाही.
 
रत्नांच्या हारात अनेक रत्ने असली तरी दाेरी एकच असते. माेती अनेक असले तरी त्यांत सूत्र एक असूनही हार शाेभिवंत दिसताे. ुले व फ ुलांचे हार माेजता येतील. पण त्यातील सुवास कसा माेजावा? या गीतेत श्लाेक सातशे आहेत व अध्याय अठरा आहेत. तरी तत्त्व एकच सांगितले आहे. आणि संगती न साेडता विवरण केले आहे. या संदर्भात अठरावा अध्याय पहावा.
 
सतराव्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण म्हणाले हाेते की, श्रद्धेशिवाय सर्व कर्मे व्यर्थ हाेत. देवाचे हे बाेलणे ऐकून अर्जुन डाेलू लागला. व मनात म्हणाला की, देवांनी कर्मास कमी प्रतीचे लेखले आहे. मनुष्याच्या अंत:करणातून रजाेगुण व तमाेगुण नाहीसे झाल्यावर जी श्रद्धा निर्माण हाेते ती कमी प्रतीची कशी असेल? शस्त्राच्या अग्राला आलिंगन देणे, दाेरीवर धावणे, नागिणीबराेबर खेळणे यांप्रमाणेच श्रद्धाविरहित कर्म करण्याचा प्रयत्न करणे हाेय.