एआयच्या चापलुसीने मान मेंदूसुद्धा गोंधळात पडतो

    02-Nov-2026
Total Views |
 
AI
संध्यानंद.काॅम
तुम्ही कदाचित असे अनेक लाेक पाहिले असतील जे तुमच्याशी सहमत हाेऊन तुमची खुशामत करतात. तुम्हाला त्यांची ही सवय कदाचित आवडतही नसेल. पण, एआय सुद्धा खुशामत करण्यात कमी पटाईत नाही.
 
तुमच्या लक्षात आले असेल की, जेव्हा तुम्ही एआयला एखाद्या अतार्किक गाेष्टीबद्दल विचारता, तेव्हा ताे क्वचितच तुमचा विराेध करताे. किंबहुना, एआय माॅडेल्सना सर्व परिस्थितीत तुम्हालाच बराेबर सिद्ध करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते.
 
याचा परिणाम असा हाेताे की, एआय वापरताना अनेकदा तुमचा गाेंधळ उडताे. त्याला तांत्रिकदृष्ट््या ‘डेल्यूशन स्पायरलिंग’ म्हणतात. ही घटना मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (चखढ) आणि वाॅशिंग्टन विद्यापीठाच्या एका संशाेधनात समाेर आली आहे.
 
एमआयटीने चॅटबाॅट माॅडेल्सच्या कार्यपद्धतीचे परीक्षण करण्यासाठी एक चाचणी केली. मानवी मेंदू सततच्या सहमतीच्या चक्रात अडकल्यावर काय हाेते, हे समजून घेण्यासाठी एक औपचारिक गणितीय माॅडेल तयार करण्यात आले. याचे परिणाम खूपच आश्चर्यकारक हाेते.
 
मदतशीर आणि विनम्र राहण्यासाठी प्रशिक्षित केलेले एआय माॅडेल, जेव्हा प्रत्येक गाेष्टीशी सहमत हाेतात, तुमच्या ‘हाे’ त ‘हाे’ मिळवतात, तेव्हा माणूस भ्रम जाळात अडकताे. मानसिकदृष्ट्या जास्त परिपक्व नसलेले लाेकच अशा भ्रमाच्या जाळ्यात अडकतात, असे आधी मानले जायचे. पण, या संशाेधनात सिद्ध झाले की, बुद्धिमान आणि तर्कशुद्ध माणसेसुद्धा अशा एआयशी बराच वेळ बाेलल्यास गाेंधळून जाऊ शकतात.
 
संशाेधकांनी चॅटबाॅटला पूर्णपणे अचूक आणि ठाेस तथ्ये दाखवण्यासाठी प्राेग्राम करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ताे काेणतेही खाेटे बाेलणार नाही. पण हेसुद्धा अयशस्वी ठरले. कारण एआयने वापरकर्त्याच्या चुकीच्या विचारांना याेग्य ठरविणारी तथ्ये शाेधली. परंतु, ताे विचार चुकीचा असल्याचे सिद्ध करणारे सत्य लपवले. एआयच्या शब्दांचा मानवी मेंदूवर किती खाेलवर परिणाम हाेताे, हे या संशाेधनावरून समजून आले.