देहबुद्धी आहे ताेवर, म्हणजे ‘मी देही आहे’ ही भावना आहे ताेपर्यंत, काळजी राहाणारच. काळजी ही मनातून असते; जाेवर संशय िफटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही, ताेवर काळजीही मनाला साेडीत नाही. कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे.
पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल, भगवंताकडे किती कल आहे, हे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती हाेईल की नाही हे सांगता येणार नाही. मनुष्यजन्म येऊनही भगवंताची प्राप्ती नाही झाली तर जिवाचे ार नुकसान आहे. भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे.
एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनताे, आणि काेणी संत भेटला की निवांत हाेताे. संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात. संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला ार घाबरवून साेडते. ‘जे मला कळले ते लाेकांना कळून लाेक सुखी हाेऊ द्या,’ हा संतांचा एकच हेतू असताे.
संत विषयावर मालकी गाजवितात. जगाला जिंकणे एकवेळ साेपे, पण स्वत:ला जिंकणे कठीण आहे.
संत स्वत:ला जिंकून जगात वावरत असतात.
संत साक्षित्वाने जगात राहतात, आणि साक्षित्वाने राहणाऱ्याला दु:खाची बाधा हाेत नाही. संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून, आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत. वास्तविक संतांच्या आज्ञेचे एक निष्ठपणाने जाे पालन करताे त्याचे संशय आपाेआप दूर हाेतात जाेंवर संशय आहे ताेंवर असमाधान आहे. समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते. म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे त्याने ार धडपड करू नये; जशी स्थिती येईल त्या स्थितींत समाधानात राहावे. कचेरीचे विचार आपल्याबराेबर घरी आणू नयेत; ते तिथेच ठेवावेत. घरातले वातावरण शुद्ध आणि नि:संशयाचे असावे.
भाेळेपण एकप्रकारे चांगले; ती एक भाग्याची गाेष्ट आहे. जाे याेगभ्रष्ट असताे त्याच्या अंगी भाेळेपण असते; जसे कल्याणस्वामींच्या अंगी हाेते. झालेल्या गाेष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे; पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता, भगवंताच्या स्मरणांत राहिल्याने आले पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर ार नाजूक बनते. त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहायला आनंद हे ार माेठे औषध आहे. हंसावे, खेळावे, लहान मुलांत मिसळावे, थट्टा-विनाेद करावा; काहीही करावे पण आनंदात राहावे.
ज्याचा आनंद कायम टिकला, त्याच्याच जन्माचे सार्थक झाले.