पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी नुकसानभरपाईच्या धोरणास मान्यता

दोषींकडून भरपाईची रक्कम केली जाणार वसूल

    09-Oct-2026
Total Views |
 
Police
मुंबई, 8 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
पाेलिस काेठडीतील व्यक्तींच्या मृत्यू प्रकरणात त्याच्या जवळच्या वारसदारांना नुकसानभरपाई देण्याबाबतच्या धाेरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या धाेरणानुसार पाेलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची मारहाण, अत्याचार किंवा दबावामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यास जवळच्या वारसदारास 5 लाखांची भरपाई देण्यात येणार आहे. अशा व्यक्तीस शारीरिक किंवा मानसिक छळामुळे पन्नास ट्न्नयांहून कमी कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचे निष्पन्न झाल्यास दाेन लाख आणि त्याहून अधिक प्रमाणात अपंगत्व आल्याचे निष्पन्न झाल्यास चार लाखांची भरपाई देण्यात येणार आहे.
 
वयाेमानानुसार किंवा काेठडीत येण्यापूर्वीच्या जुन्या असाध्य आजाराने नैसर्गिकरीत्या मृत्यू झाल्यास, अचानक उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती, स्वतःहून वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिल्यास, काेठडीतून पलायन करताना अपघात हाेऊन मृत्यू झाल्यास, अवाजवी मागणीसाठी उपाेषण किंवा वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिल्याने झालेला मृत्यू या परिस्थितीत ही भरपाई दिली जाणार नाही. या धाेरणात निष्काळजीपणाचे स्वरूप, तपासण्या, प्रमाणपत्रे, अपंगत्वाची पडताळणी, भरपाईचे प्रस्ताव सादर करण्याची पद्धती निश्चित करण्यात आली आहे.