मुंबई, 8 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
महिला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील याेगदानाची अधिकृत ओळख मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र नाेंदणीसाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
7 ऑक्टाेबरपर्यंत राज्यभरातून 37 लाख 93 हजार 51 अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील प्रत्येक पात्र महिला शेतकरी या उपक्रमाशी जाेडली जावी, यासाठी कृषी विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
राज्यातील 895 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन 68,436 महिलांना शेतकरी महिला प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.
अर्जसंख्येत यवतमाळ जिल्हा आघाडीवर असून, तेथून 2 लाख 53 हजार 439 अर्ज प्राप्त झाले आहेत. सातारा 2 लाख 14 हजार 787, नाशिक 2 लाख 10 हजार 327, अमरावती 2 लाख 5 हजार 74, पुणे 1 लाख 73 हजार 49 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. बुलढाणा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, साेलापूर, नंदुरबार, जळगाव, नांदेड, धाराशिव, धुळे, बीड आणि जालना जिल्ह्यांतून एक लाखांहून अधिक महिला शेतकऱ्यांनी नाेंदणी केली आहे.