जिममध्ये केलेला जादा व्यायाम हृदयरोगाला कारणीभूत ठरतो

    09-Oct-2026
Total Views |

HeartAttack 
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी लाेक सकाळी सकाळी जाॅगिंग व जिमचा आधार घेतात. पण कधी कधी अत्यधिक जिम करणे आपल्यासाठी घातक ठरू शकते. हृदयराेग तज्ज्ञांच्या मते प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्यामुळे हृदयाघाताच्या अ‍ॅटॅकचा धाेका वाढताे. जर काही लक्षणांकडे लक्ष दिले तर ते लवकर कळू शकते.
 
एम्सच्या कार्डियाेलाॅजी विभागाचे प्राेफेसर डाॅ्नटर संदीप मिश्रा यांनी सांगितले की, क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे व दीर्घकाळ बाॅडी बनवण्यासाठी वापरली जाणारी स्टेराॅइड घेणे हृदयाच्या आराेग्यासाठी हानिकारक आहे. त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार जिंकलेले एक प्रसिद्ध बाॅडीबिल्डर अत्यंत वाईट स्थितीत एम्सच्या इमर्जंन्सीत पाेहाेचले. डाॅ्नटरांनी सांगितले की, आम्हाला टेस्टमध्ये आढळून आले की, स्टेराॅइड जास्त काळ वापरल्यामुळे त्यांचे हृदय फेल झाले हाेते. तसा त्यांचा जीव वाचवला गेला.
 
42 वर्षीय संदीपला जिममध्ये आला अ‍ॅटॅक :
दिल्लीचे 42 वर्षीय संदीप नाहर जिम करीत हाेते. ते काेराेनामुळे अनेक महिने जिमला जाऊ शकले नव्हते. जेव्हा पुन्हा जिम सुरू झाले तेव्हा त्यांनी सुरुवातीलाच तीन ते चार तास राेज जिममध्ये व्यायाम करू लागले. तिसऱ्या दिवशी त्यांना ए्नसरसाइजदरम्यान हृदयात तीव्र वेदना आल्या व पीएसआरआय हाॅस्पिटलमध्ये त्यां अ‍ॅडमिट करण्यात आले. हाॅस्पिटलमध्ये कार्डियाेलाॅजी व इले्नट्राेफिजियाेलाॅजीच्या डाॅ्नटरांच्या टीमला त्यांचा बीपी खूप असल्याचे आढळले. ईसीजीत त्यांना हार्टअ‍ॅटॅक आला हाेता, हे समजले.
 
ही लक्षणे दिसताच त्वरित हाॅस्पिटलमध्ये जा
 नेहमीपेक्षा जास्त घाम येणे आणि घबराट.
 शरीराचे असंतुलन हाेणे.
 छातीत वेदना, दबाव, जखडन किंवा जडपणा.
 हात, मान वा जबड्यात वेदना वा दाब, श्वासाचा अभाव.
 हातांमध्ये बधिरपणा आणि अत्यधिक थकवा.