वाच्यार्थ :
(हे राजन!) क्राेध यमाप्रमाणे (प्राणहर्ता) आहे. तृष्णा वैतरणी नदीसमान, विद्या कामधेनूसारखी, तर संताेष (समाधान) हा नंदनवनाप्रमाणे (स्वर्गातील उद्यान) आहे.
भावार्थ :
काही दाेष व गुण कशा समान आहेत, हे चाण्नयांनी येथे सांगितले आहे.
1) क्राेध ः
संतापाने माणसाचे र्नत जळते, डाेके तापते, शरीरालाच कंप सुटताे, डाेळ्यात अंगार उतरताे; माणूस बेभान हाेताे. या अवस्थेत माणूस इतरांना इजा करू शकताे किंवा त्यांचे प्राणही हरण करू शकताे. तसेच त्याचा र्नतदाब उच्च हाेऊन त्याचे हृदय बंद पडू शकते. स्ट्राेकचे मेंदूच्या हालचाली थांबू शकतात किंवा ताे लुळापांगळा हाेऊ शकताे. अशाप्रकारे मृतवत अवस्थेत जिवंत राहताे.