मुंबई, 7 ऑ्नटाेबर (आ.प्र.) :
वृंदावन इथल्या संत प्रेमानंद महाराज यांचा आश्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच श्री कृष्ण जन्मभूमी संघर्ष ट्रस्टचे अध्यक्ष फलाहरी महाराज यांच्या पत्रामुळे प्रेमानंद महाराजांचा आश्रम पुन्हा एका नवीन वादात अकडला आहे.
धक्कादायक म्हणजे फलाहरी महाराज यांनी पत्रातून विराट काेहली यांच्या नावाचा उल्लेख करत सर्वात माेठा दावा केला आहे.
फलाहरी महाराज यांनी पत्रातून दावा केला आहे की, प्रेमानंद महाराजांची कीर्ती वाढवण्याच्या प्रयत्नात विराट काेहलीला 5 काेटी रुपयांना आमंत्रित करण्यात आले हाेते. पण, हा दावा फलाहरी महाराजांनी केला असून, त्याची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही.
त्या पत्रात पुढे असा दावा करण्यात आला आहे की, विराट काेहलीला 5 काेटी देऊन आश्रमात आणणारी कंपनी राजस्थानची असून, या कंपनीशी संबंधित काही लाेक नंतर साधूंच्या वेशात आश्रमात आले.
हे लाेक आता मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमध्ये गुंतले आहेत. हे दावे करत फलाहरी महाराजांनी आश्रमाच्या कामकाजाची आणि इथे उपस्थित असलेल्यांच्या भूमिकेची चाैकशी करण्याची मागणी या पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात फलाहरी महाराजांनी संत प्रेमानंद महाराजांना सनातन आणि हिंदू धर्मासाठी एक महत्त्वाचे संत म्हणून संबाेधलंय. ते पुढे म्हणाले आहे की, महाराजांशी संबंधित काही घटक त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पाेहाेचवत असावेत. त्यांनी प्रेमानंद महाराजांना अशा व्यक्तींपासून दूर राहण्याचे आवाहन या पत्राद्वारे केलं आहे. फलाहरी महाराजांनी संतांबद्दल आदर आणि त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंताही व्यक्त केली असून, त्यांनी सरकारला त्यांची सुरक्षा वाढवण्याची विनंती केलीय.