श्री दासबोध नित्यपाठ

आम्हास द्रव्य काये करावे। ते जावें परी अपत्य व्हावे ।।१।।

    08-Oct-2026
Total Views |

RamdasSwami 
मरता मरता वाचलेला ताे माणूस पुन्हा कसा निगुतीने प्रपंचाला लागताे ते सांगताना श्रीसमर्थ सुरेख शब्दयाेजना करतात.
ते म्हणतात ‘‘बरवी घरवात मांडिली’’.
 
आपल्या संस्कृतीत नांदत्या घराचे सुलक्षण म्हणजे राेज संध्याकाळी देवापुढे दिवा लावणे हे मानले जाते. असा दीप बाह्य अंधाराचा आणि अंतरातल्या दुर्वासनांचा नाश करताे आणि घर आणि मन दाेन्ही तेजाने भरून प्रसन्न करताे असे मानले जाते. म्हणूनच त्याने घरात उत्तम तेलवात करायला सुरुवात केली. गेलेले वैभवही पुन्हा प्रयत्नाने मिळविले; पण तरीही त्याचा पैशाचा लाेभ सुटला नाही. वैभव हाती आले पण पाेटी संतान नाही म्हणून ती दाेघे पती-पत्नी फार दु:खी झाली. वंशवृद्धीला पुत्र हवा पण ताे नशिबात नसेल तर सुखदायी कन्या तरी व्हावी म्हणून देवाची करूणा भाकू लागला. त्याच्या कृपेने त्यांना मूल झाले आणि त्याचे काेडकाैतुक करण्यात ते मग्न झाले. त्या बाळाला काेठे ठेवू आणि काेठे नकाे असे त्यांना हाेऊन गेले. पण दुर्दैवाचा फेरा पुन्हा आला आणि ते बाळ अकस्मात मरण पावले.