राज्यातील संरक्षित स्मारकांच्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी : शेलार

    08-Oct-2026
Total Views |
 
HistoricalStatue
मुंबई, 7 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
पुरातत्त्व विभाग आणि जिल्हा नियाेजन समितीच्या निधीतून केली जाणारी राज्य संरक्षित स्मारकांच्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांनी दिले.
 
सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध विषयांचा आढावा बैठकीत शेलार यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस विभागाचे सचिव डाॅ. किरण कुलकर्णी, पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित हाेते. पुरातत्त्व संचालनालयाने 2025-26 आणि 2026-27 या आर्थिक वर्षांत जिल्हा नियाेजन समिती; तसेच विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावांच्या सद्यस्थितीबाबत बैठकीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी संबंधित प्रस्तावांच्या प्रगतीचा, उपलब्ध निधी आदी मुद्द्यांचा शेलार यांनी आढावा घेतला. या निधीतून राज्यभरात झालेल्या आणि प्रगतिपथावर असलेल्या कामांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. राज्य संरक्षित स्मारकांची कामे गुणवतापूर्ण केली जावीत, असे निर्देश शेलार यांनी दिले.