बाळ-बाळंतिणीच्या सुरक्षेसाठी उपयुक्त सल्ला

    08-Oct-2026
Total Views |
 
Pregnancy
आई हाेणे काेणत्याही स्त्रीच्या जीवनातील सर्वांत सुंदर क्षण असताे. अशा वेळी तिला निरनिराळ्या मार्गांनी अनेक सल्ले मिळत असतात. जर आपण पहिल्यांदाच आई हाेत असाल तर खालील छाेट्या छाेट्या सल्ल्यांचा आपल्या आणि आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी अवश्य विचार करा.
 
काय करावे?
माॅर्निंग सिकनेस :
हा जरी सकाळी हाेणारा त्रास म्हणून ओळखला जात असला तरी प्रेग्नन्सीत हा त्रास दिवसभरात कधीही हाेऊ शकताे.काॅफी वा इतर एखाद्या खाद्यपदार्थाच्या वासामुळे आपल्याला मळमळू लागते.
यासाठी नेहमी आपल्यासाेबत आवडता स्नॅ्नस व पेयपदार्थ ठेवावा. मळमळू लागल्यानंतर प्रथम आपल्या आवडीचा पेयपदार्थ घ्यावा व दाेन मिनिटे आराम करावा. ताज्या भाज्या, धान्य, कडधान्ये, डाळी, बीन्स, सुकामेवा आपल्या आहारात असावा.
 
व्यायाम :
व्यायाम अत्यंत आवश्यक असताे. पण आपले शरीर व क्षमता जेवढी परवानगी देईल तेवढाच व्यायाम करावा. चालणे एक उत्तम व्यायाम हाेऊ शकताे. विशेषकरून सुरुवातीच्या दाेन्ही तिमाहीत जमेल तेवढे चालावे. हे शरीर मजबूत ठेवत प्रसूतीही साेपी बनवते. या काळात वजन उचलणे, पाेहणे, पळणे असे व्यायाम करू नयेत. तणावमुक्तीची तंत्रे अनुसरून प्रसूतीपूर्वी केले जाणारे व्यायाम करावेत. सात ते नऊ तास झाेप घ्यावी.
 
तब्येतीवर लक्ष ठेवावे :
आराेग्यासंबंधित त्रासांकडे पुरेसे लक्ष द्यावे. जर डायबिटीस वा ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर ब्लडप्रेशर व ब्लडशुगर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा.