4. दया- रागावणे साेपे आहे, मात्र क्षमा करणे कठीण आहे. दया दाखविणे तर त्याहूनही कठीण. रस्त्यावर झाेपलेल्या भिकाऱ्याला पाहून ‘अरेरे!’ म्हणणारे, काेरडी माया दाखविणारे सगळेच असतात; पण नालीतील महाराेग्याला उचलून आणून त्याच्या पुनर्वसनाचा प्रयत्न करणारे ‘बाबा आमटे’ अत्यंत विरळाच! दया दाखविणे म्हणजेच माणुसकी! आणि माणसाच्या जन्माला आल्यानंतर ‘माणुसकी’ हाच खरा धर्म ! (कर्तव्य).
बाेध ः सुख हे ‘मानण्यात’ आहे; ती ‘बाह्य’ अवस्था नसून मनाची अवस्था आहे. शांती, समाधान, तृप्ती, धर्मपालन (माणुसकी) हेच खरे जीवनाचे मर्म आहे; परंतु यासाठी कठाेर साधना करावी लागते.