तिळाच्या तेलाचे औषधी गुण

    06-Oct-2026
Total Views |

TilacheTel 
तेल वायुराेगांना नष्ट करते. परंतु तिळाचे तेल विशेषरूपाने वातघ्न आहे. हे तेल आपल्या स्निग्ध, उष्ण व तरल गुणांमुळे शरीराच्या सर्व भागांत प्रवेश करून हळूहळू मेदाचा क्षय व दाेषांचे उन्मुलन करते. हे तेल सर्व तेलांमध्ये श्रेष्ठ आहे. महर्षी चरकांनुसार तिळाचे तेल बलवर्धक, त्वचेसाठी हितकर, उष्ण व स्थैर्य देणारे आहे.
 
तिळाच्या तेलाचे औषधी उपयाेग : दात हलणे व पायाेरिया- तिळाचे तेल काेमट करून 10 मिनिटे ताेंडात ठेवल्याने हलणारे दातदेखील मजबूत हाेतात. आणि पायाेरिया बरा हाेताे.
 
लठ्ठपणा, खाज, खरूज : तिळाच्या काेमट तेलाने एक महिना शरीराची मालीश केल्याने त्वचेची कांति वाढते. चरबी कमी हाेते व खाज-खरूज नष्ट हाेते.
 
टाचेला भेगा पडणे : मेण व सैंधव मीठ मिश्रित तिळाचे तेल पायाच्या टाचेला लावल्यास टाच मऊ हाेते.