सायबर गुन्हेगार आता मोबाइल फोनवर अधिक सक्रिय होत आहेत

    06-Oct-2026
Total Views |

Cyber 
अहमदाबाद, 5 ऑ्नटाेबर (वि.प्र.) :
सणासुदीचा हंगाम जवळ येताच सायबर गुन्हेगारांनी आपला माेर्चा माेबाइल फाेनकडे वळवला आहे. ऑनलाइन खरेदी आणि विविध ऑफर्सच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी बनावट लिंक, बनावट वेबसाइट आणि आकर्षक ऑफर्सचा वापर वाढत आहे. नवरात्र आणि दिवाळीच्या काळात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये 40 टक्क्यांपर्यंत वाढ हाेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 
सायबर क्राइम विभागाने नागरिकांना अनाेळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा दिला आहे. गुजरात पाेलिस आणि सायबर क्राइम शाखेने गणेशाेत्सवानंतर आता नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन फसवणुकीबाबत विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
 
सणासुदीत ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढत असल्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात. आकर्षक सवलती आणि ऑफर्सच्या नावाखाली नागरिकांना लिंक पाठवून त्यांची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती मिळ वण्याचा प्रयत्न केला जाताे.
अनेकदा नागरिकांना बनावट वेबसाइटवर नेऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जातात.
 
नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत थहरीींअिि वर खरेदीच्या लिंक; जीएसटीच्या नावानेही फसवणूक नवरात्र आणि दिवाळीच्या काळात थहरीींअिि वर आकर्षक खरेदी ऑफर्सच्या लिंक पाठवून फसवणूक हाेण्याचा धाेका अधिक असताे. सायबर गुन्हेगार नामांकित ई-काॅमर्स कंपन्यांच्या वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या बनावट वेबसाइट तयार करतात. त्यावर माेठ्या सवलती दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जाते. नवरात्रीत कपडे, दागिने आणि इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंची माेठ्या प्रमाणावर खरेदी हाेते. या काळात बनावट ऑनलाइन स्टाेअर्स किंवा फिशिंग लिंकच्या माध्यमातून ग्राहकांना जाळ्यात ओढले जाऊ शकते.
 
जीएसटी दरांतील बदलांचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेऊ शकतात. जीएसटी कपातीमुळे विशेष ऑफर, स्वस्तात वस्तू खरेदी करा अशा संदेशांच्या माध्यमातून बनावट लिंक पाठवली जाऊ शकते. त्यामुळे काेणतीही ऑफर खरी आहे की नाही, याची खात्री केल्याशिवाय लिंकवर क्लिक करू नये. पाेलिसांच्या माहितीनुसार, दरवर्षी सणासुदीच्या काळात सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येते. लाेकांना डिस्काउंट, माेफत भेटवस्तू किंवा रिवाॅर्ड्सच्या आमिषाने लक्ष्य केले जाते.
 
सायबर फसवणुकीचे बदलते प्रकार फसवणूक करणारे नामांकित ब्रँडच्या नावाने बनावट लिंक पाठवून 90 टक्क्यांपर्यंत सूट किंवा फ्री शाॅपिंग व्हाउचर अशा ऑफर्सचे आमिष दाखवू शकतात. साेशल मीडियावर माेठ्या सवलतींच्या बनावट जाहिराती दिल्या जातात. त्यावर क्लिक केल्यानंतर ग्राहकांना खाेट्या ई-काॅमर्स वेबसाइटवर नेले जाते.
 
काही प्रकरणांत बनावट कस्टमर केअर किंवा हेल्पलाइनच्या नावाखाली संपर्क साधला जाताे. तसेच लकी ड्राॅ, गिफ्ट, रिवाॅर्ड किंवा कॅशबॅकच्या नावाखाली वैयक्तिक माहिती किंवा पैसे मागितले जाऊ शकतात. णझख खऊ च्या माध्यमातून अनाेळखी व्यक्तीला पैसे पाठवण्यास सांगणे हाही फसवणुकीचा प्रकार आहे.
 
सतर्क राहण्यासाठी काय करावे ? ऑफर कितीही आकर्षक वाटली तरी अनाेळखी लिंकवर क्लिक करू नका. खरेदीसाठी संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा अधिकृत अ‍ॅपचाच वापर करा. साेशल मीडियावरील माेठ्या डिस्काउंटच्या जाहिरातींची सत्यता तपासा. णझख किंवा बँकिंग माहिती अनाेळखी व्यक्तीस देऊ नका. हाॅटेल बुकिंग किंवा इतर सेवांसाठीही बनावट वेबसाइट आणि लिंकपासून सावध राहा.