नाशिक, 5 ऑक्टाेबर (आ.प्र) :
रेल्वेच्या वेगाने सुरू असलेल्या विद्युतीकरणाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात ओव्हरहेड ट्रॅक्शन लाइनच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांना आता ट्रॅक्शन लाइनचे विशेष काैशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार असून, देशभरातील या पहिल्या पथदर्शी प्रकल्पासाठी नाशिक औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आली.
गेल्या काही वर्षांत रेल्वेचे विद्युतीकरण वेगाने सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून रेल्वेचे 100 ट्नके विद्युतीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेच्या 100 ट्नके विद्युतीकरणाच्या उद्दिष्टामुळे येत्या काळात उच्चदाबाच्या ट्रॅक्शन लाइनवरील कामासाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांची माेठी गरज भासणार आहे. 25 हजार व्हाेल्ट एवढ्या उच्च दाबावर काम करावे लागत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष प्रशिक्षण घेतलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते.
ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. प्रस्तावानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या स्किल्ड मॅनपाॅवर डेव्हलपमेंट उपक्रमांतर्गत या याेजनेला मंजुरी देण्यात आली. यात औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना या संदर्भात प्रशिक्षण देण्याचा निकष ठेवण्यात आला. या अनुषंगाने नाशिकच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामाेदर सावरकर शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे.
पुढील टप्प्यात इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडमधील विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये शिक्षण घेत असतानाच अडीच ते तीन महिने विशेष अल्पकालीन प्रशिक्षण दिले जाईल.
आयटीआय पूर्ण करून बाहेर पडणारे विद्यार्थी थेट रेल्वेत किंवा कंत्राटदारांकडील देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी सज्ज असतील. त्यामुळे कामाचा वेग आणि गुणवत्ता वाढेल, असा विश्वास व्य्नत करण्यात येत आहे.
हे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी रेल्वेच्या एकलहरे येथील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट फाॅर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (आयरीन) या संस्थेच्या मदतीने नाशिक आयटीआयमध्ये अत्याधुनिक प्रयाेगशाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे 50 ते 60 लाखांचा निधी रेल्वे व आयरीनमार्फत पुरवला जाईल, अशी माहिती उपसंचालक रवींद्र मुंडासे यांनी दिली. या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून नाशिक व दिंडाेरी परिसरातील 12 आयटीआय शिक्षकांची पहिली तुकडी सध्या आयरीनमध्ये एक महिन्याचे प्रशिक्षण घेत आहे. हे प्रशिक्षित शिक्षक आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.