शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावू नये : बावनकुळे

    06-Oct-2026
Total Views |

ShetkariDushkal 
छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काेणत्याही बँकेने शेतकऱ्याकडे तगादा लावू नये. तसेच सावकाराने शेतकऱ्यांना त्रास देऊ नये अन्यथा सरकार साेडणार नाही, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
 
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील गावांची पाहणी करण्यापूर्वी बावनकुळे येथे बाेलत हाेते. अचूक पंचनामे व्हावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचे नियाेजन करावे लागणार असून, जलसाठे मजबूत करण्यावर सरकारचा भर असेल, असे बावनकुळे यांनी सांगितले.