प्लॅस्टिक पुनर्रचनेसाठी सहभाग आवश्यक : मुंडे

    06-Oct-2026
Total Views |

PlasticAbhiyan 
ठाणे, 5 ऑक्टाेबर (आ. प्र.) :
पर्यावरणाचा समताेल राखणे आणि प्लॅस्टिकचा वाढता प्रभाव राेखणे गरजेचे असून, ग्लाेबल वाॅर्मिंग थांबवण्यासाठी सर्वांच्या एकत्र येण्याची आवश्यकता आहे. प्लॅस्टिकचे दुष्परिणाम गंभीर आहेत. या पार्श्वभूमीवर, शासनाचा एकही रुपया खर्च न करता स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) मदतीने प्लॅस्टिक पुनर्प्रक्रियेचे कार्य सुरू करण्यात येत आहे.
 
राज्यातील 13 ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या महा आरपेट या अभियानाची सुरुवात ठाण्यातून हाेत असून, असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
 
हिंदुस्तान काेका-काेला बेव्हरेजेस कंपनी, राज् शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महापालिकेच्या विद्यमाने आयाेजित महा आर-पेट बाॅटल व स्टिकर्स अनावरण आणि उद्घाटन प्रसंगी मुंडे बाेलत हाेत्या. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित हाेते.