जय महाराष्ट्र, दिलखुलासमध्ये रवींद्र साठे यांची विशेष मुलाखत

    06-Oct-2026
Total Views |

KhadiGramUdyog 
मुंबई, 5 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
ग्रामीण भागातील स्थानिक काैशल्य, कष्टकरी मनुष्यबळ आणि उपलब्ध संसाधनांना राेजगार व स्वयंराेजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम खादी आणि ग्रामाेद्याेग क्षेत्राच्या माध्यमातून केले जात आहे, असे राज्य खादी व ग्रामाेद्याेग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र आणि दिलखुलास या कार्यक्रमांसाठी झालेल्या विशेष मुलाखतीत ते बाेलत हाेते.
 
जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही विशेष मुलाखत मंगळवारी (6 ऑक्टाेबर) रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे; तसेच ही मुलाखत महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमांवरही उपलब्ध हाेईल. दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत 6 ते 10 ऑक्टाेबर या कालावधीत सकाळी 7.25 वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एआयआर या अ‍ॅपवरून प्रसारित करण्यात येईल. निवेदिका अवंती देसाई यांनी ही मुलाखत घेतली आहे.