आपण दिवसभर चालताे, उभे राहताे, धावताे आणि शरीराचा संपूर्ण भार आपल्या पायांवर असताे. त्यामुळे तळवे दुखणे ही अनेकांची सामान्य तक्रार असली, तरी वारंवार किंवा सतत हाेणाऱ्या तळव्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करणे धाेकादायक ठरू शकते. काही वेळा ही वेदना केवळ थकव्यामुळे असते, तर काही वेळा ती एखाद्या गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते.
(भाग 2)
काेणती लक्षणे गंभीर मानावीत?
खालील लक्षणे दिसल्यास त्वरित डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा : तळवे सतत किंवा अनेक आठवडे दुखत असतील, चालताना तीव्र वेदना हाेत असतील, सूज, लालसरपणा किंवा ताप जाणवत असेल, पाय बधिर हाेणे किंवा मुंग्या येणे, मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या पायाला जखम हाेऊन ती भरून येत नसेल, घरच्या घरी काय काळजी घ्यावी? पायांना पुरेशी विश्रांती द्या, काेमट पाण्यात पाय 1015 मिनिटे बुडवून ठेवा, हलका मसाज आणि तळव्यांचे स्ट्रेचिंग व्यायाम करा, मऊ तळाचे, याेग्य मापाचे आणि आरामदायी पादत्राणे वापरा, वजन नियंत्रणात ठेवा, नियमित चालणे आणि व्यायाम करा; परंतु वेदना वाढल्यास अति श्रम टाळा.
उपचार : तळवे दुखण्याचे उपचार कारणानुसार ठरतात, वेदनाशामक किंवा सूज कमी करणारी औषधे, फिजिओथेरपी आणि स्ट्रेचिंग व्यायाम, ऑर्थाेटिक इनसाेल किंवा विशेष साेल वापरणे, मधुमेह किंवा जीवनसत्त्वांच्या कमतरतेवर याेग्य उपचार, अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याने इतर उपचारपद्धती.
प्रतिबंध हाच सर्वाेत्तम उपाय तळवे निराेगी ठेवण्यासाठी याेग्य पादत्राणे वापरणे, वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित व्यायाम करणे, पायांची स्वच्छता राखणे आणि मधुमेहासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वेदना वारंवार हाेत असल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते.