वाच्यार्थ : शांतीसारखे दुसरे तप नाही, समाधानासारखे दुसरे सुख नाही, तृष्णेसारखी दुसरी व्याधी नाही आणि दयेसारखा दुसरा धर्म नाही.
भावार्थ : काही गाेष्टी अतुलनीय आहेत.
1. शांती ः मानसिक शांती अतिशय महत्त्वाची आहे. अशांत माणूस हा मनाने आणि शरीराने अस्वस्थ असताे. अशी व्य्नती अस्वस्थ हालचाली (पाय हलविणे, बाेटे माेडणे इ.) चुळबुळ करते. तसेच अशा व्य्नतीच्या चेहऱ्यावर आठ्या असतात, तणाव स्पष्ट दिसताे. त्यांना धीर नसताे.