मुंबई, 4 ऑ्नटाेबर (आ.प्र.) :
देशात दरराेज अंदाजे 263 टन काॅफीचा वापर हाेताे. भारतीय केवळ काॅफीप्रेमी नाहीत, तर ते संपूर्ण जगाला त्यांच्या काॅफीच्या प्रेमात पाडत आहेत. म्हणूनच भारत आपल्या काॅफी उत्पादनापैकी 70 टक्के काॅफी जगभरातील लाेकांना चव देण्यासाठी निर्यात करताे.
आंतरराष्ट्रीय काॅफी संघटना आणि जागतिक वापराच्या अहवालानुसार, जगभरात दरराेज अंदाजे 2.5 अब्ज कप काॅफी प्यायली जाते. काॅफी पिणाऱ्यांची संख्याही 1 अब्जापेक्षा जास्त आहे. दैनंदिन खर्चाचा हिशेब केल्यास, जगभरातील काॅफीवरील एकूण दैनंदिन खर्च अंदाजे 86000 काेटी रुपये (अंदाजे 10 अब्ज डाॅलर्स) इतका येताे. शिवाय, या काॅफीच्या उत्पादनासाठी दरराेज अंदाजे 40 काेटी लिटर पाण्याचा वापर केला जाताे.
भारतात दिवसातून दाेन-तीन कप काॅफी पिऊन तुम्ही माेठे काॅफीप्रेमी झाला आहात असे तुम्हाला वाटत असेल, तर फिनलंडमधील लाेकांची दैनंदिन दिनचर्या तुम्हाला आश्चर्यचकित करेल. आंतरराष्ट्रीय काॅफी संघटना आणि वर्ल्ड पाॅप्युलेशन रिव्ह्यूच्या आकडेवारीनुसार, नाॅर्वे, आइसलँड, डेन्मार्क आणि नेदरलँड्ससारखे युराेपीय देश त्यानंतर येतात. लाेकसंख्येच्या तुलनेत एकूण वापराच्या बाबतीत, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (णड) जगात आघाडीवर आहे. फिनलंड हा दरडाेई काॅफी पिणारा जगातील सर्वाधिक देश आहे.
येथील सरासरी व्यक्ती वर्षाला 12 किलाेग्रॅम काॅफी पिते. एक सरासरी प्राैढ व्यक्ती दरराेज अंदाजे 3.77 कप काॅफी पिते आणि आठवड्याच्या दिवसांमध्ये हा आकडा 4 ते 9 कपपर्यंत वाढताे. काॅफी बाेर्ड ऑफ इंडिया आणि क्रिसिलच्या अहवालानुसार, 2024 मध्ये भारताचा देशांतर्गत काॅफीचा वापर 96,000 टन असेल, असा अंदाज आहे. याचा अर्थ असा की आपल्या देशात दरराेज अंदाजे 263 टन काॅफी वापरली जाते.