येथे यज्ञाचा अर्थ आजच्या काळात संशाेधन/सत्कार्य असाही घेता येताे. ज्या संशाेधनात संशाेधकाला सखाेल ज्ञान नाही किंवा ज्ञान आहे; पण ज्याचे परिणाम लाेकाेपयाेगी नाहीत किंवा ज्याने केवळ परिश्रम, पैसा व वेळ व्यर्थ जाताे; असे संशाेधन न केलेलेच बरे!
बाेध :
यज्ञ करताना चांगल्या प्रतीचे तूप (घृत), तीळ, समिधा आणि पवित्र साहित्य वापरून (वातावरणासह) सर्वांचे भले व्हावे यासाठी पूजा केली जाते; परंतु यात केवळ वेळ, श्रम आणि अन्नाची नासाडीच हाेत असेल, अमंगल हाेत असेल, तर ताे न केलेलाच बरा!