ज्ञानेश्वरी

    31-Oct-2026
Total Views |

Dyaneshwar 
ऐसा गीता वैष्णवप्रासादुŸ। अठरावा अध्याय कळसु विशदुŸ।
म्यां म्हणितला हा भेदुŸ। जाणाेनियां Ÿ।। (18.49)
 
या अठराव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर गीतारूपी प्रासादाचे वर्णन करीत आहेत. श्रीगुरूची कृपा म्हणूनच आपण हा प्रासाद निर्माण केला असे ते म्हणतात. या कलशाध्यायाचे वर्णन करताना गीतारत्नमंदिराचा अठरावा अध्याय हा कळसरूपाने आहे. हा कळस चिंतामणीचा बनला आहे.
 
हा अध्याय म्हणजे गीतेचे दर्शन घडविणारा वाटाड्या आहे. कळसाचे दर्शन घेतले की, देवाची भेट हाेते. अशा समजूतीप्रमाणे या अध्यायामुळे गीतेचे दर्शन हाेईल. व्यास हे स्वत: माेठे प्रतिभावंत कारागीर हाेते. वेदरूपी रत्नाच्या पर्वतावर, उपनिषदरूपी पठारावर त्यांनी हा प्रासाद निर्माण करण्यास सुरूवात केली खणण्यास सुरूवात केल्यावर धर्म, अर्थ, काम यांचा चुरा निघाला. या चुऱ्याचा काेट या गीतारूपी मंदिराभाेवती बांधला. या खाणीमध्ये आत्मज्ञानरूपी व एकजीव असा अखंड दगड निघाला. ताे चातुर्याने साफसूफ करून व्यासांनी कृष्णार्जुनसंवादाचे रूप त्याला दिले. निवृत्तिरूप ओळंबा लावून व्यासांनी माेक्षाचा त्याला आकार दिला. गीतेच्या पंधराव्या अध्यायापर्यंत मुख्य बांधकाम झाले. साेळावा अध्याय हा घुमटाप्रमाणे आहे.
 
सतरावा अध्याय कळसाच्या ओट्याप्रमाणे आहे. आणि अठरावा कळसरूपाने आहे. या मंदिराचे बांधकाम सर्वांगांनी पूर्ण झाले आहे. व्यासांनी हे मंदीर माेक्षसुखासाठी बांधून त्याचे रक्षण केले आहे. काेणी या गीतेचे श्रवण करून, काेणी वाचून उपासना करतात. नीट अवधान देऊन या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात.
 
आणि आत्मरूप श्रीहरीची भेट घेतात. श्रीमंतांच्या घरी सर्वांना सारखेच पक्वान्न असते. त्याप्रमाणे या प्रासादामुळे सर्वांना सारखेच आत्मसुख हाेईल. म्हणून मी या गीतेस वैष्णवमंदीर आणि अठराव्या अध्यायास कळस असे म्हटले आहे.