श्री दासबोध नित्यपाठ

त्रिविधतापे पोळला। तोचि येक अधिकारी जाला ।।२।।

    31-Oct-2026
Total Views |

RamdasSwami 
यातील पहिला ताप आध्यात्मिक म्हणजे माणूस धारण करीत असलेल्या देहाला हाेणारे आजार व दु:ख यांचा आहे. या दु:खाचे मूळ शरीरात आहे. परमेश्वराने माणसाला सुद्दढ शरीर दिले आहे; पण त्याची नीट निगा न राखल्यास विविध राेगांनी ते जर्जर हाेऊ शकते. शरीरात उपयाेगी पडणारे जे सर्व अवयव आहेत ते ठाकठीक असण्यामध्ये सुख आहे.
 
पण सुख देणारे अवयव विविध राेगांना बळी पडू शकतात. असा राेग झाला तर देहाची संपत्ती असलेला ताे अवयव नवीन वेदना आणि जबाबदारी बनताे. अर्थशास्त्रात ’अीीशीीं र्ढीीपळपस ळपीें ङळरलळश्रळींळशी’’ असे म्हणतात त्याप्रमाणे एके काळची शरीरसंपदा व्याधीमुळे शरीरव्यथा हाेऊन जाते.
 
यानंतर श्राेत्यांच्या मनावर हा आध्यात्मिक ताप कसा असू शकताे हे पूर्ण ठसावे म्हणून श्रीसमर्थ शरीरव्याधींची अनेक उदाहरणे देतात. एखाद्या तज्ज्ञ डाॅ्नटरलाही चटकन सुचणार नाही इत्नया बारकाईने ते त्यांचे वर्णन करतात. खरूज, खवडे, नखुरडे, मांजरी, गाेवर, देवी, व्याधी, मूळव्याधी, गालगुंड, कुष्ठ, क्षय, पंडुराेग, दमा, पाेटदुखी, घसादुखी, मानदुखी, हे राेग ते सांगतातच. शिवाय मुरडा, अतिसार, नागीण, कावीळ, रक्तपिती, परमा, मुतखडा, अपचन, अजीर्ण, हगवण, दातदुखी, दाढदुखी, आव, आमांश, ज्वर, जलाेदर अशा गंभीर राेगांचाही उल्लेख करून ते सांगतात की हे सर्व आध्यात्मिक तापाचेच प्रकार आहेत. हे सर्व सांगण्यामागे त्यांचा एकच उद्देश आहे की, ज्याला आपण आपला म्हणताे आणि प्रेम करताे ताे देह हा इत्नया सगळ्यांची शिकार हाेऊ शकेल इतका अनित्य आहे. हे श्राेत्यांनी ध्यानात घेऊन आपल्या शरीराबद्दलचा अभिमान आणि लाेभ कमी केला पाहिजे. त्याचा नाशवंत गुणधर्म लक्षात घेतला पाहिजे आणि ताे जाणून अविनाशी व स्थिर अशा परमात्म्याकडे अवधान दिले पाहिजे!
 
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299