कुंभमेळ्यामुळे नाशिक क्लस्टरच्या मालवाहतुकीला नवी गती

देवळालीसह ४ रेल्वे स्थानकांवर सुविधांचा होणार विस्तार

    30-Oct-2026
Total Views |

CentralRailway 
नाशिक, 29 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराजवळील पाच स्थानकांवरील पायाभूत सुविधांची उभारणी रेल्वे मालवाहतूक आणि साठवणूक (लाॅजिस्टिक्स) उद्याेगाला बळ देणार आहे. नाशिक राेड ध्न्नयावरील ताण कमी करत मालवाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने उद्याेगांना सभाेवतालच्या देवळाली, खेरवाडी, निफाड व कसबे सुकेणे रेल्वे स्थानकांचा माल चढ-उतरवण्यासाठी वापर करण्याचे साकडे घातले.
 
मालगाड्यांमधून माल उतरवण्यासाठी किंवा भरण्यासाठी नवीन मार्गिकांची व्यवस्था हाेत असल्यामुळे रेल्वेला एकाचवेळी अनेक रॅक हाताळणे शक्य हाेणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने रेल्वे मालवाहतूक आणि साठवणूक उद्याेग संवाद मेळावा आयाेजिला हाेता.
 
भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात उद्याेगांच्या गरजा लक्षात घेऊन रेल्वे मालवाहतुकीच्या माध्यमातून व्यवसायाच्या नव्या संधी विकसित करण्यावर भर देण्यात आला. याप्रसंगी मध्य रेल्वेचे उपवित्त सल्लागार व मुख्य लेखाधिकारी अरुणकुमार नायर, इरिनचे अतिर्नित महासंचालक डी. एल. मीना यांच्यासह भुसावळ विभागातील वरिष्ठ शाखाधिकारी उपस्थित हाेते.
 
यावेळी मालवाहतुकीच्या सुविधा सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. नाशिक क्लस्टरमध्ये नाशिक राेड, खेरवाडी, देवळाली, निफाड, कसबेसुकेणे आणि लासलगाव हे रेल्वे मालधक्के आहेत.
 
यापैकी मालवाहतुकीसाठी केवळ नाशिक राेड स्थानकाचा सर्वाधिक वापर हाेताे. इतर स्थानकांचा वापर कमी आहे. या विभागात मुख्यत्वे कांदा व इतर शेतमालाची वाहतूक हाेते.
 
नाशिक क्लस्टरमधून राेज 2.5 रॅकपर्यंत माल हाताळला जाऊ शकताे. नाशिक राेड परिसरातील मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आसपासच्या स्थानकांवर नवीन मार्गिका सुविधांचा विकास हाेत आहे. यामुळे उद्याेगांना व रेल्वेला एकाचवेळी अनेक रॅक हाताळणे शक्य हाेईल.
 
नाशिकपासून जवळच असणाऱ्या खेरवाडी, निफाड, देवळाली किंवा कसबे सुकेणे यासारख्या भागात रॅक लाेड, अनलाेड केल्यास नाशिक राेडवरील भारही कमी हाेईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.