नाशिक, 29 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि कालबद्ध अंमलबजावणी करावी.
पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, टँकरद्वारे पाणीपुरवठा, राेजगार हमीची कामे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत या बाबींना प्राधान्य देऊन प्रशासनाने सतर्क राहावे. ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा पुरेल, असे नियाेजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत शिंदे बाेलत हाेते. या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित हाेते. दुष्काळ निवारणाच्या कामात महसूल, कृषी, जलसंपदा, जलसंधारण, पशुसंवर्धन, ग्रामविकास आणि अन्य संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्यवाही करावी.
उपलब्ध साधनसंपत्तीचा याेग्य वापर करून शेतकरी व ग्रामीण नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे शिंदे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययाेजनांची माहिती दिली.
नशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजाराेहण साेहळ्याचे सूक्ष्म नियाेजन करावे. ध्वजाराेहण साेहळ्यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मान्यवर व भाविकांची संभाव्य उपस्थिती लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, गर्दी नियंत्रण, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आराेग्य सुविधा, आपत्कालीन यंत्रणा आणि पार्किंग व्यवस्थेचे नियाेजन करावे. धार्मिक परंपरा आणि साेहळ्याचे पावित्र्य जपत भाविकांना सुरक्षित व सुलभ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश शिंदे यांनी दिले.