विहिरींच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक प्रभागाला ३० लाखांचा निधी

    30-Oct-2026
Total Views |

Well 
मुंबई, 29 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
मुंबई महापालिका हद्दीतील पारंपरिक विहिरींची स्वच्छता करणे, त्यांचा गाळ काढणे व पुनर्भरण करून त्यांचा वापर पिण्याव्यतिर्नितच्या कामांसाठी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात 30 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
राज्यावर दुष्काळाचे सावट पसरल्याने मुंबई महापालिकेनेही सावध भूमिका घेत पाण्याचे अतिर्नित पर्याय शाेधण्यास सुरुवात केली आहे.
 
जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार; तसेच एल-निनाे आणि आयओडीच्या प्रभावामुळे आगामी काळात मान्सूनचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.
 
या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी महापालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली हाेती. त्यानुसार आता महापालिकेने प्रत्येक प्रभागात विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी 30 लाखांचा निधी मंजूर केला आहे.
 
या प्रकल्पांतर्गत प्रायाेगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात प्रत्येक विभागातील खुल्या विहिरींची निवड करून त्यांची स्वच्छता, गाळ काढणे आणि डागडुजी करण्यासाठी तसेच प्रत्येकी पाच हजार लिटर क्षमतेची साठवण टाकी, उपसापंप यंत्रणा उभारण्यासाठी मंजूर निधी विभागीय सहायक आयु्नतांकडे वर्ग करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार विभागीय सहायक आयु्नत किंवा महापालिका आयु्नतांच्या मंजुरीने अधिकचा निधी प्राप्त केला जाईल.
 
मुंबईत पूर्वी पाणीपुरवठ्याचे महत्त्वाचे स्राेत असलेल्या अनेक विहिरींची दुरवस्था झाली आहे. वाढते नागरीकरण, विहिरींमध्ये साचणारा गाळ-कचरा तसेच घटलेल्या भूजल पातळीमुळे पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे.
 
सध्या काही विहिरींमधील पाणी बागकाम, स्वच्छता किंवा अन्य बिगरपिण्याच्या कामांसाठी वापरले जाते. त्यामुळे उपलब्ध असलेल्या उर्वरित विहिरींचे पुनरुज्जीवन करून त्यांचा नियाेजनबद्ध वापर केल्यास महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यावरील भार काही प्रमाणात कमी हाेऊ शकताे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.