किडनी हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचं इंद्रिय आहे. रक्तातील नकाे असणारे घटक काढून टाकून रक्त शुद्ध करण्याचं महत्त्वाचं कार्य किडनी करत असते. त्या व्यतिरिक्त रक्त तयार हाेण्यासही किडनी मदत करते. शरीरातील पाण्याचा समताेल राखणं, आम्ल आणि अल्कलीचे प्रमाण व्यवस्थित ठेवणं, रक्तदाब स्थिर ठेवणं इ. महत्त्वाची कामेही किडनी करत असते.
किडनी हा मानवी शरीरातील एक महत्वपूर्ण अवयव आहे. याची तुलना सुपर काॅम्पुटरशी करणे उचित ठरेल, कारण किडनीची रचना खूप अनाेखी आहे आणि तिचे कार्य अतिशय गुंतागुंतीचे आहे. किडनी शरीरातील रक्त साफ करून मुत्राची निर्मिती करते. शरीरातून मुत्र बाहेर टाकण्याचे कार्य मुत्रवाहिनी (णीशींशी) मूत्राशय (णीळपरीू इश्ररववशी) आणि मुत्रनलिका (णीशींहीर) यांच्याद्वारे केली जाते.
किडनी हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचं इंद्रिय आहे. रक्तातील नकाे असणारे घटक काढून टाकून रक्त शुद्ध करण्याचं महत्त्वाचं कार्य किडनी करत असते. त्या व्यतिरिक्त रक्त तयार हाेण्यासही किडनी मदत करते. शरीरातील पाण्याचा समताेल राखणं, आम्ल आणि अल्कलीचे प्रमाण व्यवस्थित ठेवणं, रक्तदाब स्थिर ठेवणं इ. महत्त्वाची कामेही किडनी करत असते.
किडनीचा शरीरातील इतर संस्था व अवयवांच्या कार्याशीही संबंध असताे. म्हणूनच किडनी निकामी हाेण्यासारख्या आजारात व्यक्तीचे शारीरिक संतुलनही बिघडते. विविध कारणांमुळे किडनीचे आजार हाेऊ शकतात.
परिणामी, त्यामुळे किडनी निकामी हाेऊ शकते. मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, मुत्र मार्गातील अडथळा, किडनीमध्ये पाण्याच्या गाठी हाेणं इ. किडनी आजारांच्या निदानासाठी तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेण्यासाेबतच विविध प्रकारच्या तपासण्या करणंही गरजेचं असतं. किडनीचे आराेग्य चांगले राखण्यासाठी एक महत्त्वाचा गाेष्ट म्हणजे साेडियम, फाॅस्फरस आणि पाेटॅशियमचे प्रमाण कमी असलेल्या संतुलित आहाराचे सेवन करणे.
या खनिजांच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण पडू शकताे, ज्यामुळे गुंतागुंत वाढू शकते. याव्यतिरिक्त, उच्च-प्रथिनयुक्त आहार मूत्रपिंडावरील ताण वाढन मूत्रपिंडाचे आजार बळावतात.
आहारात भरपूर ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे कारण ते किडनीच्या कार्यास आवश्यक आहे ते पाेषक आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात.