नवी दिल्ली, 29 ऑ्नटाेबर (वि.प्र.) :
वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्याची प्रक्रिया अधिक कठाेर करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले आहेत. शिकाऊ वाहन परवान्याच्या (लर्निंग लायसन्स) परीक्षेतील उत्तीर्ण हाेण्यासाठी आवश्यक गुणांची मर्यादा 60 टक्क्यांवरून 75 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबराेबर अनेक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून काही सेवा माेफत देण्याचीही याेजना आहे.
शिकाऊसाठी 15 दिवसांची मुदत केंद्रीय माेटार वाहन नियम, 1989 मध्ये प्रस्तावित सुधारणांनुसार शिकाऊ परवान्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सध्याच्या सात दिवसांऐवजी 15 दिवसांची मुदत मिळणार आहे. अर्जदारांना किमान 30 मिनिटांचे सुरक्षित वाहनचालना प्रशिक्षण घेणेही बंधनकारक असेल.
कागदपत्रांच्या नियमांत बदल अर्जदारांना पत्ता, वय आणि ओळखीचे स्वतंत्र पुरावे सादर करावे लागतील. यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपाेर्ट, ई-रेशन कार्ड आणि इतर सरकारी ओळखपत्रे ग्राह्य धरली जातील.
मागील तीन महिन्यांतील वीज किंवा घरगुती गॅस बिलही पत्त्याचा पुरावा म्हणून स्वीकारले जाईल. परदेशी नागरिकांना भारतातील कायदेशीर वास्तव्याचा पुरावा द्यावा लागेल.
परवान्यातील बदलांसाठी शुल्क नाही ः
नवीन ‘फाॅर्म 2ए’द्वारे परवान्याचे नूतनीकरण, दुय्यम परवाना, नावपत्ता बदल आणि वाहनांच्या श्रेणींची भर यांसारख्या सेवा एकत्रित केल्या जातील. नाव, पत्ता किंवा नाेंदविलेल्या इतर तपशिलांमध्ये बदल करण्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही.
आराेग्यविषयक माहिती देणे आवश्यक ः
अर्जदारांना अपस्मार, आकडीचे विकार, श्रवणदाेष, रातांधळेपणा, औषधांची अॅलर्जी आणि शरीरातील वैद्यकीय प्रत्याराेपण यांची माहिती द्यावी लागेल. गेल्या तीन वर्षांत आकडी आलेल्या किंवा सध्या अपस्मारावरील औषधाेपचार सुरू असलेल्या व्यक्तींना प्रस्तावित नियमांनुसार परवाना मिळणार नाही. रक्तगट आणि आपत्कालीन संपर्क क्रमांकाची माहितीही अर्जात मागविण्यात येणार आहे.
नागरिकांकडून सूचना मागविल्या ः
केंद्र सरकारने हे प्रस्तावित नियम ई-गॅझेट संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असून नागरिक आणि संबंधित घटकांकडून 30 दिवसांत सूचना मागविल्या आहेत.