स्तुति कांहीं न बाेलणेंŸ। पूजा कांहीं न करणेंŸ।
सन्निध कांहीं न हाेणेंŸ। तुझ्या ठायीं Ÿ।। (18.25)
सद्गुरूचे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज तात्त्विक दृष्टीने त्याचे रूप विवरून सांगतात. मागे सतराव्या अध्यायातील पंधराव्या ओवीत ज्ञानेश्वर म्हणतात की, गुरूराजा, माैन हे आपले जन्मराशीवरून काढलेले नाव आहे. मग मी तुझी स्तुती कशी करू ? हाच भाव अठराव्या अध्यायातील वरील ओवीत आला आहे. सद्गुरूचे वर्णन करण्यास आपणांस संकाेच वाटताे, असे ज्ञानेश्वर म्हणतात.
पण चंद्रकांत मणी पाझरताे ताे चंद्रामुळेच. झाडांना पालवी येते ती वसंत ॠतुमुळे. कमळे उमलतात ती सूर्यकिरणांमुळे, मीठ विरघळते ते पाण्यामध्येच.
त्याप्रमाणे सद्गुरूनाथा, तुझे स्मरण झाले की, मी संकाेच साेडून तुझी स्तुती करू लागताे. गुरूनाथा, तू माझ्या मीपणाचा त्याग करून स्तुतीच्या रूपाने माझ्या वाणीला वेड लावले आहेस.
महाराज, तुमचे स्वरूप एकरस असल्यामुळे गुण व गुणातीत यांची निवड कशी करावी? माेती आधी ाेडून ताे सांधणे किंवा ताे आहे तसाच ठेवणे यांतील अधिक चांगले काेणते ? देवा, तू बाप आहेस, आई आहेस. अशा वर्णनाने तुझी याेग्य स्तुती हाेत नाही.
कारण आईबाप ही संज्ञा लेकरू या शब्दाची संबंधित आहे. एखादी व्यक्ती दास झाली की ती परावलंबी हाेतेच. अशा सापेक्षपणानेच तुझे वर्णन मी कसे करू ? स्वामी, तू अंतर्बाह्य व्यापून राहणारा आत्मा आहेस. असे म्हटले तरी आत असणाऱ्या तुला मी बाहेर आणले असे हाेईल. म्हणून महाराज, तुमचे वर्णन करण्यास जगामध्ये शब्द दिसत नाहीत.
माैनावाचून दुसरा काेणताच अलंकार तुला शाेभत नाही. तुझ्यासंबंधी काही न बाेलणे हीच तुझी स्तुती आहे. काही न करणे ही तुझी पूजा आहे. जीव, शिव, ब्रह्म असा काेणताच अभिमान न धरता तुझी जवळीक साधता येते. तरी श्रीगुरू, तुम्ही माझी विनंती सहन करावी.