ज्ञानेश्वरी

    03-Oct-2026
Total Views |
 
Dyaneshwar
वार्षिया क्षाेभे गगनŸ। वसंत दुणावे वनŸ।
देहा शृंगारी याैवनŸ। दशा जैसी Ÿ।। (18.112)
 
अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत सांगतात की, सकाम कम ार्ंचा त्याग म्हणजे संन्यास हाेय. आणि कर्मफलांचा त्याग म्हणजे त्याग हाेय.
 
सर्व सकाम व्रतांचा हेतू फलप्राप्ती हा असताे. देहरूपी गावास आल्यावर जन्ममरणरूपी साहेळे भाेगावयास लागतात. ब्रह्मदेवाने जे कपाळी लिहिलेले असते ते कधी चुकत नाही. कर्जापासून जशी सुटका हाेत नाही. तसे सकाम कर्माच्या फळापासून मुक्तता हाेत नाही. लढाईत ज्याप्रमाणे युद्ध न करताही बाण लागताे, गूळ न समजता ताेंडात घातला तरी गाेडीचा अनुभव येताे, अग्नीवर पाय दिला की पायास चटका बसताे, त्याप्रमाणे केलेल्या कर्माचे फळ अवश्य भाेगावे लागते. म्हणून सकाम कर्माची आवड ठेवू नये.
 
पाेटात गेलेले विष जसे ओकून टाकावे, त्याप्रमाणे काम्य कर्माचा त्याग करावा. भय समूळ नाहीसे करणे म्हणजे त्याचे मूळ जे द्रव्य त्याचा त्याग करणे.
 
त्याप्रमाणे काम्यकर्म टाकणे म्हणजे फलाची इच्छा साेडून देणे. चंद्र व सूर्य यांची ग्रहणे आली असता श्राद्धप्रसंगाची आठवण हाेते. आईबापांचे मरण आठवते. अतिथी येताे तेव्हा जे आपण करताे ते नैमित्तिक कर्म समजावे. वर्षा ॠतू आला असता वनाची शाेभा दुप्पट वाढते. तारुण्य आले की शरीर सुशाेभित हाेते. चंद्रकांतमणी चंद्राच्या याेगाने पाझरताे. कमळे सूर्याच्या किरणांमुळे ुलतात. याचा अर्थ असा की, जे मूळात असते तेच विस्तारते.
 
त्याप्रमाणे नित्यकर्म वाढत जाते. आणि नित्यकम ार्ला नैमित्तिक असे नाव येते. राेज सकाळी, संध्याकाळी करावे लागते, पण ते अधिक आहे असे वाटत नाही, डाेळ्यांची दृष्टी डाेळ्यांना अधिक वाटत नाही, गती बाहेरून न येता पायांतच असते. दिव्याच्या ज्याेतीमध्येच प्रकाश असताे. चंदनाला सुगंध देण्यासाठी पुटे द्यावी लागत नाहीत.