पोटाच्या समस्यांसाठी आंबट - गोड मोसंबी ज्यूस रामबाण

    03-Oct-2026
Total Views |

Mosambi 
आंबट-गाेड चवीची माेसंबी आराेग्यासाठी खूपच फायदेशीर असते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, मिनरल्स आणि फायबर आढळतात. जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवते. याला गाेड लिंबूही म्हणतात. डाॅ्नटरही आजारी व्यक्तीला माेसंबी खाण्यास व तिचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.
 
हृदयाचे आजार : माेसंबीचा ज्यूस नियमितपणे घेतल्यास काेलेस्ट्राॅल लेव्हल कमी हाेते. जी हार्ट अ‍ॅटॅकचा धाेका कमी करण्यास मदत करते.
 
त्वचेत कांती : चेहऱ्यावर कांती आणण्यासाठी माेसंबी ज्यूस प्यायला हवा. हा चेहऱ्यावर हाेणारे पिंपल्स व मानेचा काळवंडलेपणाही दूर करते.
 
पाण्याची भरपाई : उन्हाळ्यात जेव्हा शरीरात पाणी कमी हाेते तेव्हा जास्तीत जास्त माेसंबीचा ज्यूस प्यायला हवा.
 
दात व हिरड्यांसाठी : यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. हे खाल्ल्यामुळे दात आणि हिरड्यांमध्ये हाेणारा स्कर्व्ही राेग नाहीसा करता येऊ शकताे.
 
भरपूर कॅल्शियम : माेसंबीच्या ज्यूसमध्ये कॅल्शियमच भरपूर प्रमाणात आढळते. गर्भवती आईने हा राेज घ्यायला हवा. हा आई आणि बाळ दाेघांच्या आराेग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
 
रक्त शुद्ध करताे : रक्त खराब झाल्यास शरीरात फाेड पुरळ व खाज खरजेची समस्या हाेते. यासाठी दरराेज सकाळ-संध्याकाळ माेसंबीचा ज्यूस प्यायला हवा. हा रक्त शुद् करताे आणि सर्व समस्यांपासून सुटका देताे.
 
बद्धकाेष्ठतेची समस्या दूर करताे : उन्हाळ्यात हा ज्यूस पिणे पाेटाच्या सर्व समस्यांसाठी रामबाण आहे. एवढेच नव्हे तर हा राेज घेतल्यास बद्धकाेष्ठतेची समस्याही नष्ट हाेते.