दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त अन्य १९ तालुक्यांत सर्वेक्षण करण्याचे निर्देश

प्रमुख पाच पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा

    03-Oct-2026
Total Views |

Shetkari
मुंबई, 2 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
राज्य शासनाने 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. ट्रिगर-1 तालुक्यांव्यतिर्नित आणखी 19 तालुक्यांत दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्याची मागणी लाेकप्रतिनिधींकडून शासनास करण्यात आली आहे. या तालुक्यांतील प्रमुख पाच पिकांचे 20 ट्नके सर्वेक्षण करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावा, अशा सूचना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
 
ट्रिगर-1 यादीतील तालुक्यांव्यतिर्नित ज्या तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता आहे, त्यांचाही आवश्यकतेनुसार विचार करण्यासाठी स्थानिक पातळीवरील माहिती व अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. दुष्काळग्रस्त तालुक्यांत पीकपंचनामे तातडीने पूर्ण करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवणे; तसेच प्रशासन अधिक सतर्क ठेवण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
 
दुष्काळाबाबतच्या शासन निर्णयानुसार, रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबत राष्ट्रीयीकृत बँकांना सूचना द्याव्यात. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांकडून कर्जवसुली करताना काेणतीही स्नती हाेणार नाही, याबाबत खासगी बँका तसेच जिल्हा बँकांना सहकार विभागामार्फत सूचना दिल्या जाव्यात, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.