काेल्हापूर, 2 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
काेल्हापूर जिल्हा अप्रतिम निसर्ग साैंदर्याने नटलेला आहे. विपुल निसर्ग संपदा लाभलेली आहे. जिल्ह्याला धार्मिक तीर्थस्थळे, क्रीडा, व्यापार, उद्याेगाची गाैरवी परंपरा आहे. काेल्हापूरचे समग्र, एकात्मिक ब्रॅडिंग करण्यासाठी काेल्हापूर महाेत्सवासारखे उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठाेड, महापालिका आयु्नत डाॅ. राजेंद्र भारूड, कुलगुरू डाॅ. राजनिश कामत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. जासमिन, इचलकरंजीच्या आयु्नत पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित हाेते.
काेल्हापूरला माेठी गाैरवी परंपरा लाभली आहे. येथील कुस्ती, कबड्डीसारखे खेळ प्रसिद्ध आहेत.
येथील वने समृद्ध आहेत. इचलकरंजीचा कापड उद्याेग, हुपरीचा चांदी उद्याेग सातासमुद्रापार पाेहाेचलेला आहे. या ठिकाणी श्री अंबाबाई, श्री जाेतिबा यासारखी तीर्थस्थळे आहेत.
काेल्हापुरी गूळ, काेल्हापुरी चप्पलसह अनेक कृषी उत्पादने, हस्तकलांचा माेठा लाैकिक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काेल्हापूरला जागतिक नकाशावर आणण्यासाठी त्याचे ब्रॅडिंग आवश्यक आहे. त्या दृष्टीने काेल्हापूर महाेत्सवासारखे महाेत्सव महत्त्वपूर्ण ठरतील.
त्यासाठी विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक वाढली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. जिल्ह्यात राबवण्यात येत असणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे सादरीकरण जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.