पत्नीमध्ये आणि विशेषत: कामवासनेमध्ये माणूस कसा गुरफटून जाताे त्याचे वर्णन करताना श्रीसमर्थ म्हणतात की, पत्नीपुढे त्याला सर्व सगेसाेयरे तुच्छ वाटू लागतात आणि त्यांचे संबंधही ताे ताेडून टाकताे. अशावेळी त्याला आजपर्यंतच्या आयुष्यात नातेवाईकांनी केलेली मदत आठवत नाही. त्यांनी केलेले प्रेमही आठवत नाही. स्त्रीच्या प्रेमामध्ये ताे सर्व लाजलज्जाही साेडून जणू तिचाच गुलाम बनताे. कामभावनेच्या जाेरापुढे काय करावे, कसे वागावे हा विवेकसुद्धा सुटताे. तिच्यापुढे ताे अगदी हीनदीन बनून तिच्या तालावर नाचत राहताे.
तिच्या सहवासासाठी आपले वैचारिक आणि शारीरिक स्वातंत्र्यही गहाण टाकताे. आपली प्रपंचातील अन्य कर्तव्ये आणि देव, धर्म, नित्यनेम, धर्मपालन, तीर्थयात्रा या सगळ्यांचा त्याला विसर पडताे. त्याची भ्नती सुटून जाते. विर्नतीचा विचारही त्याच्या मनास शिवत नाही. मग आत्मज्ञान आणि माेक्षाची साधना लांबच राहिली.
काेणत्याही शुभअशुभ लक्षणांकडे लक्ष न देता ताे तन, मन आणि धन या सर्वांनी स्त्रीच्या चरणी दास बनताे.
त्याला आपले प्रापंचिक आणि पारमार्थिक हितही कळत नाही. देवदर्शन घेण्याचीही शुद्ध राहात नाही. पत्नीपुढे त्याला सर्व ब्रह्मांडही थिटे वाटू लागते आणि जवळचे नातेवाईकही दूरचे वाटतात.