4. भाव ः मनातील देवावरील निस्सीम भावामुळेच कशापासूनही बनविलेल्या मूर्तीला देवत्व प्राप्त हाेते.
म्हणून ‘भाव’ हे मूळ कारण आहे.
बाेध ः चराचरात हरीला पाहणाऱ्या श्रेष्ठ अशा भ्नतप्रल्हादाला त्याच्या पित्याने हिरण्यकश्यपूने संतापून विचारले, ‘‘या खांबात तुझा देव आहे का ?’’ तर त्याने ‘‘हाे’’ म्हटले नि खराेखरच त्यातून ‘नृसिंह’ रूपाने परमेश्वर प्रकट झाले आणि आपल्या भ्नताचा विश्वास खरा ठरविला. खरंच, ‘भाव ताेचि देव’.