गोंदवलेकर महाराज

शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच मिळतो

    03-Oct-2026
Total Views |

GondavlekarMaharaj 
जगात प्रत्येक मनुष्य स्वत:ला आनंद मिळावा म्हणून धडपडताे आहे. किंबहुना, आनंद नकाे असे म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही.
म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असताे.
 
मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद, समाधान, का बरे न मिळावे? याला कारण असे की हा शाश्वत आनंद एका भगवंतावाचून दुसऱ्या कुठेही मिळणे शक्य नसल्या कारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत.
 
त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे; आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे. आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे, आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये साेडून द्यावा. कधी ताे सुखात राहील तर कधी दु:खात राहील; कधी ताे बरेच दिवस सरळ जाईल, तर कधी ताे मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल; पण त्याच्या काेणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. तुम्ही सर्व माणसे ार चांगली आहात, भगवंताचे नाम घेता, हे मला माहीत आहे. परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला ार वाईट वाटते. तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे? तुमची परिस्थिती आड येते का? इथे मंदिरात राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचे प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बराेबर नाही. तुम्ही इथे आनंदाने राहा, मंदिरात जेवा, आणि ‘राम राम’ म्हणा असे मी सांगताे. पण या लाेकांनीसुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते असे म्हटले तर बाहेरून येणाऱ्या लाेकांना मी काय सांगू? मनुष्य सहज एकटा रस्त्याने चालला असताना आपणच शिट्टी वाजवताे आणि आनंदित हाेताे.
 
आपल्यातून निघालेली आपलीच शिट्टी आपणच ऐकून आनंद पावताे. भगवंताच्या सृष्टीच्या बाबतीत तसेच आहे. सृष्टी म्हणजे भगवंताच्या आनंदाचे व्यक्त स्वरूप. सृष्टी आनंदमयच आहे. आपण ती दु:खमय समजताे. सृष्टीवर प्रेम करणे म्हणजे भगवंतावर प्रेम करणे हाेय. आपण भगवंताजवळ आनंद मानावा.
 
आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणे बराेबर नाही. आनंद जाेडणाऱ्या गाेष्टींचा आपण विचार करू या आणि नामस्मरणात राहू या. बाळंत झाल्यावर स्त्रीला गराेदरपणाच्या कष्टांचा विसर पडून अपत्यदर्शनाचा आनंद हाेताे, त्याचप्रमाणे परमात्म्याच्या दर्शनाचा आनंद साधनाचे कष्ट विसरायला लावताे.