संध्यानंद.काॅम
शाळेच्या अभ्यासासाठी अख चॅटबाॅट्सचा वापर न करणारे विद्यार्थी, अख वापरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी करतात, असे जएउऊ (जीसरपळीरींळेप षेी एलेपेाळल उे-ेशिीरींळेप रपव ऊर्शींशश्रेिाशपीं) च्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक अहवालात म्हटले आहे. या अहवालातून अख तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम हाेऊ शकताे, याचे आतापर्यंतचे सर्वात व्यापक पुरावे मिळाले आहेत.
अख न वापरणाऱ्या विद्यार्थ्यांचे विज्ञानात चांगले गुण ज्या विद्यार्थ्यांनी लेखनाच्या असाइनमेंटसाठी कधीही किंवा जवळजवळ कधीही अख वापरत नाही, त्यांनी विज्ञानाच्या परीक्षेत सरासरी 509 गुण मिळवले. याउलट, लेखनासाठी दरराेज किंवा जवळजवळ दरराेज अख वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना 481 गुण मिळाले. म्हणजेच दाेन्ही गटांमध्ये 28 गुणांचा फरक आहे. विद्यार्थ्यांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतरही हा फरक कायम राहताे. जएउऊ च्या मते, हा फरक साधारणपणे दीड वर्षाच्या अध्यापनाइतका आहे. अख च्या इतर वापरांमध्येही अशाच प्रकारची प्रवृत्ती दिसून आली.
उदाहरणार्थ : नवीन विषयावर प्राथमिक संशाेधन करणे, दिलेला अभ्यासाचा मजकूर संक्षिप्त करणे.
या कामांसाठी अख वर अधिक अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांची कामगिरी तुलनेने कमी असल्याचे आढळले.
खेळ पाहून फिटनेस हाेत नाही; खेळ केल्याने हाेताे जएउऊ चे शिक्षण आणि काैशल्य विभागाचे संचालक अँड्रियास श्लायशर यांनी याबाबत एक महत्त्वाची तुलना केली. त्यांच्या मते, ज्याप्रमाणे खेळ पाहिल्याने आपण तंदुरुस्त हाेत नाही, तर प्रत्यक्ष खेळ केल्याने हाेताे; त्याचप्रमाणे केवळ माहिती किंवा कंटेंट पाहिल्याने शिकणे हाेत नाही. नवीन विषयाशी स्वतःच्या बुद्धीने संघर्ष आणि विचार केल्याने खरे शिक्षण घडते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अख चा वापर आधार (ीलरषषेश्रव) म्हणून करावा, आधाराची काठी (र्लीीींलह) म्हणून नाही, असे त्यांनी सांगितले.
म्हणजेच अख ने विद्यार्थ्यांना विचार करण्यास, समजून घेण्यास आणि स्वतःची उत्तरे विकसित करण्यास मदत केली तर त्याचा फायदा हाेऊ शकताे. परंतु अख मुळे विद्यार्थ्यांची स्वतः विचार करण्याची आणि समस्या साेडवण्याची प्रक्रिया कमी झाली, तर त्यांच्या बाैद्धिक विकासावर त्याचा विपरीत परिणाम हाेऊ शकताे.
अख चा याेग्य वापर महत्त्वाचा श्लायशर यांच्या मते : तंत्रज्ञान विद्यार्थ्यांची विचार करण्याची प्रक्रिया सुलभ किंवा अधिक प्रभावी करत असेल, तर विद्यार्थ्यांची प्रगती हाेईल. पण, तंत्रज्ञानाने शिकण्यासाठी आवश्यक असलेली स्वतःची विचारप्रक्रिया शाॅर्टकट केली, तर विद्यार्थ्यांच्या विकासाला धक्का बसू शकताे. याचा अर्थ असा नाही की अख पूर्णपणे वाईट आहे. उलट, विद्यार्थ्यांनी अख चा वापर याेग्य पद्धतीने करून त्यातून शिकण्याचा फायदा घ्यावा; मात्र अख कडून थेट उत्तर घेऊन स्वतः विचार करणे टाळू नये.
झखडअ परीक्षेचा माेठा अभ्यास ः हा निष्कर्ष झखडअ (झीेसीरााश षेी खपींशीपरींळेपरश्र र्डीींवशपीं अीीशीीाशपीं) या आंतरराष्ट्रीय परीक्षेच्या आकडेवारीवर आधारित आहे. झखडअ मध्ये 15 वर्षांच्या विद्यार्थ्यांची विज्ञान, गणित आणि वाचन या विषयांमधील क्षमता तपासली जाते. जगातील विविध देशांच्या शिक्षणव्यवस्थेची तुलना करण्यासाठी या परीक्षेकडे राजकारणी आणि धाेरणकर्ते माेठ्या प्रमाणावर पाहतात. या अहवालातील निष्कर्ष 91 देशांमधील 7.6 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधिक नमुन्यावर आधारित आहेत.