पिसर्वेमध्ये शाळेत मुलींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाचे हस्तांतर

    29-Oct-2026
Total Views |
 
Gramin
पसर्वे, 28 ऑ्नटाेबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
पुरंदर तालु्नयातील पिसर्वे येथील डाॅ. शंकरराव काेलते विद्यालय व ज्युनिअर काॅलेजमध्ये मुलींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाचे गुरुवारी (7 ऑ्नटाेबर) शाळेकडे हस्तांतर करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी, पालक व ग्रामस्थ उपस्थित हाेते.
 
पुण्यातील ज्येष्ठ अभियंता आर. बी. सूर्यवंशी यांनी पुणे जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील शाळांमध्ये बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडिया (बीआयए) पुणे सेंटरच्या सहकार्याने 19पेक्षा अधिक स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे.
 
ज्याचा साडेतीन हजारांपेक्षा जास्त मुलींना लाभ झाला. 19 पैकी 12 स्वच्छतागृहे आर. बी. सूर्यवंशी यांनी वैयक्तिक खर्चातून, तर 7 बीआयए, पुणे सेंटरच्या सहकार्यातून उभारली आहेत.
 
या उपक्रमाविषयी सूर्यवंशी म्हणाले, ‘ग्रामीण भागातील मुलींना सुरक्षित व आराेग्यदायी वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. या सुविधांअभावी विद्यार्थिनींचे शिक्षण थांबू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.’ कार्यक्रमास उपस्थितांनी आर. बी. सूर्यवंशी यांना या उपक्रमाबद्दल मनापासून धन्यवाद दिले.