गोंदवलेकर महाराज

समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे

    29-Oct-2026
Total Views |

GondavlekarMaharaj 
प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, काही पथ्ये पाळायला लागतातच नेहमी ‘राम कर्ता’ ही भावना मनात जागृत ठेवा. शाेक, चिंता, भीती, आशा, तृष्णा, ह्या सर्व ‘राम कर्ता’ म्हटल्याने नाहीशा हाेतात. ज्याअर्थी त्या अजून नाहीशा हाेत नाहीत, त्याअर्थी राेग कायमच आहे असे म्हटले पाहिजे.
 
तरी आजपासून, ह्या घटकेपासून, नामात रहाण्याचा निश्चय करा, आणि ‘राम कर्ता’ ही भावना दृढ करा. कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्यापुरते बरे वाटते. ते समाधान म्हणता येईल का ? जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही ते समाधान. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे. ते मिळवण्यासाठी प्रपंच साेडण्याची जरूरी नाही. प्रपंच साेडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच. तेव्हा तसा ताे साेडता येत नाही; ताे एक ‘राम’ म्हटल्यानेच सुटू शकेल.
 
काेणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा. त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदु:खाच्या द्वंद्वांत गुरफटला जाणार नाही. जाे काेणी स्वत:चा उद्वार करून घेईल ताे खरा ज्ञानी; काही न करणारा हा खरा अडाणी हाेय. वासनेचे परिणत स्वरूप म्हणजे बुद्धि हाेय. जी बुद्धि बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धि हाेय. बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे वागणारी ती स्वैराचारी बुद्धि हाेय. वासना नष्ट हाेणे म्हणजे देहबुद्धि नष्ट हाेणे हाेय. प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही. त्याचे विषयाचे प्रेम रक्तात इतकेभिनले आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे.ते घेतल्याने विषयाचे प्रेम नष्ट हाेईल. खराेखर थाेडा मनापासून निश्चय करा; ताे परमात्मा ार दयाळू आहे, ताे खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी राहील. दाेष न पाहताही जाे दुसऱ्याला जवळ करताे ताे दयाळू खरा.
 
भगवंत अत्यंत दयाळू आहे; त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम नष्ट हाेईल, आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की संसारावरचेही प्रेम कमी हाेईल आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल. प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते.
 
ती ओढ परमेश्वराप्राप्तीनेच पुरी हाेऊ शकते. ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर काेणते असेल, आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल, तर एका नामानेच. ज्याने नाम हृदयात अखंड बाळगले त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. इतर साधनांमध्ये उपाधीमुळे थाेडी तरी चलबिचल आहे, नाम हे स्थिर आहे. हे भगवंताचे नाम आवडीने घ्या, श्रद्धेने घ्या, मनापासून घ्या, आणि आतापासूनच घ्यायचे ठरवा.