मुंबई, 28 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
देशासाठी लढणाऱ्या राज्यातील अग्निवीरांना राज्य सरकारच्या गट-क गणवेशधारी सेवांच्या भरतीत दहा ट्नके समांतर आरक्षण देण्याचा तसेच त्यांना थेट नाेकरीत नियु्नत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार नियमात आवश्यक ते बदल करून 282 अग्निवीरांना नियु्नती देण्यास मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अग्निवीरांना शिस्त, नेतृत्व, तांत्रिक काैशल्य, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा आणि संघटनात्मक कार्यपद्धतीचे कठाेर प्रशिक्षण दिले जाते. चार वर्षाच्या सेवेनंतर कामगिरी, शिस्त आणि काैशल्य या निकषांच्या आधारे 25 ट्नके अग्निवीरांना कायमस्वरूपी सैन्यदलात सामावून घेतले जाते. उर्वरित 75 ट्नके अग्निवीरांना सेवानिवृत्त केले जाते.
या माजी अग्निवीरांना राज्यात गृह, राज्य उत्पादन शुल्क, वन, नगर विकास आदी प्रशासकीय विभागांतर्गत विविध आस्थापनांवरील गणवेशधारी गट-क सेवांमध्ये नाेकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या महिन्यात घेतला हाेता.
त्यानुसार महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या माजी अग्निवीरांसाठी 10 ट्नके समांतर आरक्षण देण्यात आले असून, त्यांना विविध विभागांच्या भरतीच्या लेखी परीक्षेतून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे; तसेच वयाेमर्यादेत 4 वर्षांची सूट, शारीरिक कार्यक्षमता चाचणी व शारीरिक मानक चाचणी सूट, ज्येष्ठता व पदाेन्नती; तसेच प्रशिक्षणातूनही सूट देण्यात आली आहे.
राज्यातून 2022 ते 2025 दरम्यान 5648 तरुण अग्निवीर म्हणून सैन्यात दाखल झाले असून, त्यातील 2496 अग्निवीर यंदा सेवामु्नत हाेणार आहेत. पुढील वर्षी 3977 अग्निवीर सेवामु्नत हाेणार आहेत.