मुंबई, 28 ऑ्नटाेबर (आ.प्र.) ः
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या गवतंडा गावातील शेतकरी कैलास कुंतेवार यांनी ‘काैन बनेगा कराेडपती’ (केबीसी) कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्यासमाेर 14 प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन 50 लाख रुपये जिंकले. मात्र, यावर्षी दुष्काळामुळे त्यांच्या शेतीचे माेठे नुकसान झाले असून, या यशानंतरही त्यांच्या आर्थिक अडचणी कायम आहेत. केवळ दाेन एकर जमीन असलेल्या कैलाश यांना उदरनिर्वाहासाठी स्वतःच्या शेतीसाेबतच दुसऱ्यांच्या शेतातही काम करावे लागते.
‘केबीसी’मध्ये जिंकलेले पैसे शेतीत गुंतवून आपली परिस्थिती सुधारेल, अशी त्याला आशा हाेती; पण निसर्गाच्या अनिश्चिततेने त्याच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत.
कैलासने जिंकलेल्या पैशातून आपल्या शेतात विहीर खाेदली; पण पाणीच आले नाही. कापसाच्या शेतीचे नुकसान झाले आणि साेयाबीनचे पीकही वाया गेले. बियाणे, खते, औषधे आणि इतर शेतीकामांवर झालेला खर्च वाया गेल्याने त्याच्याकडे उत्पन्नाचे काेणतेही साधन उरलेले नाही. शेतीतून आपल्या कुटुंबाचे भविष्य सुधारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कैलाससमाेर आता घरखर्च कसा भागवायचा आणि पुढच्या पिकासाठी पैसे कुठून आणायचे, असे प्रश्न उभे आहेत. विहीर असूनही पाणी न मिळणे आणि कठाेर परिश्रम करूनही उत्पन्न न मिळणे यामुळे त्याची परिस्थिती दयनीय झाली आहे.
कैलास कुंतेवारची ही परिस्थिती मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या अडचणींचे प्रतिबिंब आहे. पावसाअभावी अनेक भागांमध्ये कापूस आणि साेयाबीनची पिके सुकत आहेत, तर काही भागांमध्ये विहिरी आणि बाेअरवेलमधील पाण्याची पातळीही कमी झाली आहे. पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांना शेतीचा खर्च वसूल करणे, कर्ज फेडणे, घर चालवणे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे कठीण झाले आहे. दुष्काळाचा परिणाम केवळ पिकांपुरता मर्यादित नाही, तर ताे संपूर्ण कुटुंबाच्या जीवनावर परिणाम करत आहे. अशा परिस्थितीत, बाधित शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत, पाण्याचे याेग्य नियाेजन आणि पुढील पिकासाठी आवश्यक पाठिंबा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
‘केबीसी’मध्ये 50 लाख रुपये जिंकूनही कैलाससमाेर आता शेती पुन्हा सुरू करण्याचे माेठे आव्हान आहे. त्याच्या कुटुंबात पत्नी, आई-वडील आणि मुले आहेत आणि कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीत गुंतवलेले पैसे आणि केलेली मेहनत वाया जात असल्याने त्याची चिंता वाढली आहे. ज्ञानाच्या जाेरावर ‘केबीसी’मध्ये माेठे यश मिळवलेल्या कैलाशकडे दुष्काळाचा सामना करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. केवळ पाण्याची उपलब्धता, याेग्य नियाेजन आणि अडचणीच्या काळात मिळणाऱ्या पाठिंब्यानेच त्याच्यासारख्या शेतकऱ्यांना शेती पुन्हा सुरू करण्याची आशा आहे.