श्री दासबोध नित्यपाठ

भगवद्भजनावांचुनी। चुकेना हे जन्मयोनी ।।२।।

    29-Oct-2026
Total Views |

RamdasSwami 
सुखासाठी आटापिटा करून शेवटी दु:खच पदरात पडते आणि मग यमयातनेची भीती वाटू लागते. थाेड्नयात जन्म हेच पुढे भाेगाव्या लागणाऱ्या दु:खाच्या व परिस्थितीच्या भीषण चट्नयाचे मूळ आहे.
 
जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाने हे सत्य ओळखावे. त्यातून सुटका मिळण्यासाठी जाे एकच मार्ग आहे त्याची म्हणजेच परमेश्वरभ्नतीची कास धरावी.
भगवंताला शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
 
मानवी आयुष्याचा प्रारंभ गर्भावस्थेत हाेताे. तेव्हाच्या कठीण अवस्थेत जीवाला त्रास हाेताे असताे. अगदी तसाच त्रास आयुष्याच्या अंतकाळी म्हणजे म्हातारपणात पुन्हा हाेताे आणि तेव्हा जन्माला येण्यामुळे हाेणारा पश्चाताप म्हातारपणी पुन्हा हाेऊ लागताे. या सर्व दु:खावर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आत्मज्ञानाने सुटका करून घेणे हाच एकमेव उपाय आहे आणि त्यासाठी भगवंताची भ्नती करून त्याची कृपा प्राप्त करून घेणे हाच एकमेव मार्ग आहे. ही मु्नती मनुष्यजन्मातच प्राप्त करून घेणे श्नय आहे. अन्य याेनीतील जीवांना ती श्नयता नाही. म्हणून मनुष्यजन्म मिळाल्याचे आपण सर्वांनी भ्नती करून आणि त्यायाेगे मु्नती मिळवून सार्थक करून घ्यावे हेच श्रीसमर्थांचे पराेपरीने सांगणे आहे.
 
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299