जयजय देव निर्मळŸ। निजजनाखिलमंगळŸ।
जन्मजराजलदजाळ-Ÿ। प्रभंजन Ÿ।। (18.1)
गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या निरूपणात शेटचा अठरावा अध्याय हा कलशाध्याय म्हणून समजला जाताे. ज्ञानेश्वर नेहमीप्रमाणे येथे आपल्या गुरुदेवाचा जयजयकार करीत आहेत. ते म्हणतात की, निर्मळ देवा, तुझा जयजयकार असाे. तू आपल्या सेवकांचे संपूर्ण कल्याण करताेस.
जन्म व म्हातारपण या मेघांची धूळधाण करणाऱ्या वायुरूप गुरुदेवा, तुझा विजय असाे. तू अतिशय सामर्थ्यवान आहेस. अशुभांचा तू नायनाट करताेस. विषयवासनेचा कैवार घेणाऱ्यांच्या कृत्यांचाही तू नायनाट करताेस. गुरूदेवा, तुझा जयजयकार असाे. निरुपाधिका, तुझ्या ठिकाणी विपुल आनंद प्रकट हाेताे. तुझ्यामुळे सर्व दाेष नाहीसे हाेतात. स्वर्गादि, लाेकांच्या उत्पत्तीचा तू एक आधारस्तंभ आहेस. श्रीगुरू, तुझा जयजयकार असाे.तू स्थिर आहेस. जगत् प्रकट करण्याचा खेळ तुला आवडताे. तू अत्यंत शुद्ध आहेस. ज्ञानाेदयरूपी अरण्यातील अहंकाराचे हत्ती तू नाहीसे करताेस.
दयासागरा, गुरूदेवा, तुझा जयजयकार असाे. तू अविकारी आहेस. मदनरूपी सर्पाचा तू नाश करताेस. भक्तांच्या घरी तू प्रेमरूपाचा दिवा आहेस. तू तापांचा नायनाट करताेस. हे अद्वितीया, तू आपल्या दासांच्या स्वाधीन हाेतासे. तू स्वरूपज्ञानरूपी वृक्षाचे बीज वाढविणारी जमीन आहेस. श्रीगुरू, तुझा जयजयकार असाे.
श्रीगुरू, तुझी स्तुती तरी किती व कशी करावी? ज्या ज्या विशेषणांनी तुझे वर्णन करावे ते ते तुझे स्वरूप नाही असे ध्यानात येते. म्हणून तुवझी स्तुती करताना मला संकाेच वाटताे. पण पूर्ण चंद्राच्या उदयामुळे समुद्राला जशी भरती येते, तसे तुझे स्मरण झाले की, माझा मीपणा मी विसरताे. मी तृप्त हाेऊन तुझी स्तुती करण्यास प्रवृत्त हाेताे.