औदुंबर : औषधी गुणधर्माचा वृक्ष

    29-Oct-2026
Total Views |

Audumbar 
आपल्या परिसरात औंदुंबराचे म्हणजेच उंबराचे झाड असणे आवश्यक आहे. कारण अतिशय, उपयाेगी, औषधी गुणधर्माचा हा वृक्ष कायम चिरतरुण ठेवताे.
उंबराच्या सालीचा काढा करून , त्यांत, वेलची, खडीसाखर टाकून सरबत करावे, कँसर सारख्या रुग्णाच्या अंगाचा जाे दाह हाेताे, त्यावर आराम पडताे. दिवसांतून तीनदा घ्यावे. औंदुबरावलेह हे प्रसिद्ध औषध पित्तज विकारांवर प्रसिध्द आहे.
 
जखम झाल्यस याच काढ्याने धुतल्यास, ती वेगाने बरी हाेते. अतिसाराच्या वेळी रक्त पडल्यास हाच काढा घ्यावा. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी, रक्तप्रदर, श्वेतप्रदर, मासिकधर्म जास्त जात असेल, तर सालिचा काढा, पाेटातून देतात. गर्भपात, हाेऊ नये म्हणून, गर्भाचे पाेषण निट व्हावे म्हणून, याच्या सालिचा काढा घेतात.
 
भस्मक नावाचा राेग आहे त्यांत सारखी भूक लागते. पाेट भरल्याची जाणीव हाेत नाही. तेव्हा, उंबराची साल दूधांत घाेटून द्यावी. कावीळीत, उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात. ज्वरदाह, तीव्र तापात, पिकलेले उंबर द्यावे,गाेवर, कांजण्या, अतिसार, उन्हाळी, मधुमेह, या सर्व राेगांवर उंबराचे फळ, पाने, फुले उपयाेगात आणली जातात.
 
किटकदंश, विंचूदंश झाल्यास झाडाची पाने वाटून लावल्यास, दाह, वेदना, कमी हाेतात. ताेंडातले अल्सर, व्रण, छाले, यावर उंबराच्या पानावर असे बुडबडे वर दिसतात. ते काढून त्याचि चटणी मधातून चाटण म्हणून द्यावे. ताेंडाचा दाह कमी हाेताे.
 
अंगात उष्णता, कडकी असल्यास उंबराची दाेन फळे राेज सकाळी खडीसाखरेसाेबत खावीत. जेव्हा खुप तहान, तहान हाेते, जीव कासावीस हाेताे, तेव्हा उंबराची साल, वा कच्ची फळे पाण्यात कुस्करून सरबत करून द्यावे डांग्या खाेकल्यावर उंबराचा चिक टाळूवर लावावा ताबडताेब थांबताे.
 
किडनी स्टाेन - उंबराच्या जुन्या झाडाच्या खाेडाला खाच द्यावी व तिथेच एक भांडे अडकावे रात्रभर रस झिरपून भांड्यात गाेळा हाेईल, ताे सकाळी पिण्यास घ्यावा. किडनी स्टाेन वितळून मूत्रावाटे बाहेर पडतात.
 
उंबर फळ दूधांत शिजवून खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत हाेते, पाेटाचे सर्व विकार बरे हाेतात. विशेषतः हे थंड गुणधर्माचे असल्यानेच, आम्लपित्त, मळमळ, पाेटात दाह, अल्सर, सारखे आजार याच्या सेवनाने बरे हाेतात.